'सुख म्हणजे नक्की काय असतं'मध्ये २५ वर्षांचा लीप, पाहायला मिळणार गौरी-जयदीपच्या पुनर्जन्माची गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 01:11 PM2023-11-06T13:11:29+5:302023-11-06T13:11:53+5:30

Sukh Mhanje Nakki Kay Asata : सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. शालिनी षडयंत्र करुन जयदीप-गौरीचं आयुष्य संपवणार आहे. प्रेक्षकांची लाडकी जोडी कायमचा निरोप घेणार आहे.

'Sukh Mhanje Nakki Kay Asta', a leap of 25 years will be seen, the story of the reincarnation of Gauri-Jaideep | 'सुख म्हणजे नक्की काय असतं'मध्ये २५ वर्षांचा लीप, पाहायला मिळणार गौरी-जयदीपच्या पुनर्जन्माची गोष्ट

'सुख म्हणजे नक्की काय असतं'मध्ये २५ वर्षांचा लीप, पाहायला मिळणार गौरी-जयदीपच्या पुनर्जन्माची गोष्ट

स्टार प्रवाह वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेनं कमी कालावधीत रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले. आता या मालिकेत नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. शालिनी षडयंत्र करुन जयदीप-गौरीचं आयुष्य संपवणार आहे. प्रेक्षकांची लाडकी जोडी कायमचा निरोप घेणार आहे. 

शालिनीचा डाव यशस्वी होणार असला तरी खऱ्या प्रेमाचा कधीच अंत होत नाही. सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत जयदीप-गौरीच्या पुनर्जन्माचा अध्याय सुरु होणार आहे. मालिकेच्या विश्वातला हा नवा प्रयोग आहे. ज्या जोडीला प्रेक्षकांचं इतकं भरभरुन प्रेम मिळालं ती जयदीप-गौरीची लोकप्रिय जोडी अधिराज आणि नित्या या नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या वळणासह मालिकेचं कथानक २५ वर्षांनी पुढे सरकणार आहे. त्यामुळे अधिराज आणि नित्याची प्रेमकहाणी नव्याने अनुभवता येईल.

पुनर्जन्माच्या या कथेत अनेक रहस्यांचाही उलगडा होणारा आहे. सोबतच अनेक नवी पात्रही भेटीला येतील. जयदीप-गौरीच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या शालिनीचं पुढे काय होणार? लक्ष्मी कुठे असेल? नंदिनी शिर्के पाटील कुठे असतील? नित्या-अधिराजची भेट कशी होणार? या आणि अश्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मालिकेच्या नव्या पर्वातून उलगडतील. सुख म्हणजे नक्की काय असतं २० नोव्हेंबरपासून नव्या वेळेत म्हणजेच रात्री १० वाजता स्टार प्रवाहवर पाहायला मिळेल.

Web Title: 'Sukh Mhanje Nakki Kay Asta', a leap of 25 years will be seen, the story of the reincarnation of Gauri-Jaideep

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.