'सुख म्हणजे नक्की काय असतं'मधल्या नव्या देवकीचा नवरादेखील आहे प्रसिद्ध अभिनेता, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 07:00 AM2022-05-11T07:00:00+5:302022-05-11T07:00:01+5:30

Sukh Mhanje Nakki Kay Asata: 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत देवकीच्या भूमिकेत मीनाक्षी राठोड(Meenakshi Rathod)च्या जागी अभिनेत्री भक्ती रत्नपारखी (Bhakti Ratnaparkhi) दिसणार आहे.

Sukh Mhanje Nakki Kay Asata Fame new Devki Alice Bhakti Ratnaparkhi's husband also famous actor | 'सुख म्हणजे नक्की काय असतं'मधल्या नव्या देवकीचा नवरादेखील आहे प्रसिद्ध अभिनेता, जाणून घ्या याबद्दल

'सुख म्हणजे नक्की काय असतं'मधल्या नव्या देवकीचा नवरादेखील आहे प्रसिद्ध अभिनेता, जाणून घ्या याबद्दल

googlenewsNext

स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ (Sukh Mhanje Nakki Kay Asata) मालिकेचे कथानक सध्या उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचले आहे. शालिनीचे डावपेच एकीकडे सुरु असताना गौरीदेखील खंबीरपणे या डावपेचांचा सामना करत आहे. शालिनीच्या प्रत्येक कारस्थानामध्ये तिची साथ देणारी सर्वात जवळची व्यक्ती म्हणजे देवकी. देवकीशिवाय शालिनी अपूर्ण आहे. मालिकेतील हे लोकप्रिय पात्र याआधी अभिनेत्री मीनाक्षी राठोड (Meenakshi Rathod) साकारत होती. मात्र मीनाक्षी खऱ्या आयुष्यात आई होणार आहे. त्यामुळे ती सध्या प्रसुती रजेवर आहे आणि तिच्याजागी अभिनेत्री भक्ती रत्नपारखी (Bhakti Ratnaparkhi) देवकीची भूमिका साकारताना दिसेल.

अभिनेत्री भक्ती रत्नपारखी सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या आधी अग्गंबाई सासूबाई आणि अग्गंबाई सूनबाई या मालिकेत दिसली होती. याशिवाय तिने बऱ्याच मालिकेत आणि चित्रपटात काम केले आहे. तिने अक्षय कुमार आणि परेश रावल ह्यांच्यासोबत ‘ओह माय गॉड’ ह्या चित्रपटात काम केलेले आहे. ह्यासोबतच तिने ‘सी कंपनी’, ‘देऊळ’ ह्यासारख्या लोकप्रिय चित्रपटांत काम केलेले आहे.

फार कमी लोकांना माहित आहे की, भक्तीचा नवरादेखील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याचे नाव आहे निखिल रत्नपारखी. निखिलने अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांत विनोदी भूमिका केल्या आहेत. तसेच त्याने ‘ओह माय गॉड’, ‘पहेली’, ‘जयंताभाई की लव्हस्टोरी’ यासारख्या हिंदी चित्रपटात काम केले आहे.

त्याचप्रमाणे तो ‘नारबाची वाडी’, ‘व्हेंटिलेटर’, ‘सुपरस्टार’ या मराठी चित्रपटात झळकला आहे. या व्यतिरिक्त त्याने मालिका आणि जाहिरातीत सुद्धा काम केले आहे.

Web Title: Sukh Mhanje Nakki Kay Asata Fame new Devki Alice Bhakti Ratnaparkhi's husband also famous actor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.