'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम देवकी उर्फ मीनाक्षी राठोडच्या लेकीचं झालं बारसं, व्हिडीओ आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 01:36 PM2022-08-26T13:36:37+5:302022-08-26T13:37:06+5:30

Meenakshi Rathod:'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम देवकी उर्फ मीनाक्षी राठोडने काही दिवसांपूर्वी लेकीचं फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले होते. त्याला चाहत्यांची खूप पसंती मिळाली होती.

'Sukh Mhanje Nakki Kay Asata' fame Devaki aka Meenakshi Rathod's daughter name ceremony, the video has surfaced | 'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम देवकी उर्फ मीनाक्षी राठोडच्या लेकीचं झालं बारसं, व्हिडीओ आला समोर

'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम देवकी उर्फ मीनाक्षी राठोडच्या लेकीचं झालं बारसं, व्हिडीओ आला समोर

googlenewsNext

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील सर्वच पात्रांना प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. याच मालिकेत देवकीची भूमिका अभिनेत्री मीनाक्षी राठोड (Meenakshi Rathod) हिने साकारली होती. या भूमिकेतून ती घराघरात पोहचली. मीनाक्षी नुकतीच आई झाली आहे. तिने गोंडस कन्येला जन्म दिला आहे. तिने तिचे फोटोशूटदेखील सोशल मीडियावर शेअर केले होते. दरम्यान आता लेकीचं बारसं पार पडलं आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

मीनाक्षी राठोडनं इंस्टाग्रामवर बारशाचा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, असं म्हणतात … नावात काय ठेवलय? पण आयुष्यभर आपली ओळख ज्या नावाने होते ते नाव तर ठेवावेच लागेल! होय! नाव ठरलंय! मीनाक्षीच्या बाळाचा बारसा १४ ऑगस्टला पार पडला. बारशाचा व्हिडीओ समोर आला असला तरी तिचे नाव अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. 


मीनाक्षी राठोडच्या पतीचे नाव कैलास वाघमारे असून त्याने देखील अनेक मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. कैलास अजय देवगणच्या ‘तानाजी द अनसंग वारियर’ या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत झळकला होता. या चित्रपटातील त्याच्या कामाचे सर्वत्र खूप कौतुक झाले होते.

मीनाक्षी आणि कैलास हे एकाच चित्रपटात देखील दिसणार असल्याचे सांगण्यात येते. या चित्रपटाची निर्मिती कैलास वाघमारे हा करतो आहे. 

Web Title: 'Sukh Mhanje Nakki Kay Asata' fame Devaki aka Meenakshi Rathod's daughter name ceremony, the video has surfaced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.