प्रसिद्ध कॉमेडी अभिनेत्यावर आली भाजी विकण्याची वेळ, मुलांसाठी घेतोय इतकी मेहनत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2021 03:19 PM2021-01-08T15:19:22+5:302021-01-08T15:25:34+5:30

सुदेश लहिरीने आपल्या करिअरची सुरूवात 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज'पासून केली होती. 'कॉमेडी सर्कस' आणि 'कॉमेडी क्लासेस'मधून छोट्या पडद्यावर तो तुफान हिट ठरला होता.

Sudesh lahri Selling Vegetables Funny Comedy Video Viral | प्रसिद्ध कॉमेडी अभिनेत्यावर आली भाजी विकण्याची वेळ, मुलांसाठी घेतोय इतकी मेहनत

प्रसिद्ध कॉमेडी अभिनेत्यावर आली भाजी विकण्याची वेळ, मुलांसाठी घेतोय इतकी मेहनत

googlenewsNext

कॉमेडी शोमधून रसिकांना खळखळून हसवणारे, त्यांची सगळी दुःख विसरायला लावणारे आणि तुफान मनोरंजन करणारा कॉमेडी अभिनेता सुदेशी लहीरी विविध स्कीट्सच्या माध्यमातून तो रसिकांचं मनोरंजन करतो. त्याचं कॉमेडीचं भन्नाट टायमिंग आणि विविध भूमिका रसिकांना कायम भावतात. कोणतंही स्कीट सादर करताना स्टेजवरील एनर्जी, आपल्या सहकलाकारासह असलेलं त्याचं ट्युनिंग यामुळे तो रसिकांना खळखळून हसवतो.

 

सुदेश सोशल मीडियावरही तितकाच एक्टिव्ह आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो आपल्या रसिकांशी कनेक्ट होत संवाद साधतो. सोशल मीडियावर आपल्या खासगी आयुष्यातील क्षण तो रसिकांसह शेअर करतो. नुकतंच सुदेशने सोशल मीडियावर एक कॉमेडी व्हिडीओ शेअर केला आहे.सध्या आपल्या कॉमिक स्टाईलने सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहे.  

सुदेश लहिरीसह या व्हिडीओथ त्याचे कुटुंबियदेखी अभिनय करत आहेत. व्हिडिओमध्ये सुदेश लहरी भाजीपाला विकताना दिसत आहे आणि तो ग्राहकांशी भांडतानाही दिसतोय. सुदेश लहिरीचा हा व्हिडिओ यूट्यूबवर तुफान हिट ठरत आहे.व्हिडिओमध्ये तो भाज्या विकत असल्याचे दिसतंय.आतापर्यंत त्याच्या व्हिडिओला 10 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले असून लाईक्स आणि कमेंटस करत पसंती देत आहेत.


सुदेशने आपल्या करिअरची सुरूवात 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज'पासून केली होती. 'कॉमेडी सर्कस' आणि 'कॉमेडी क्लासेस'मधून छोट्या पडद्यावर तो तुफान हिट ठरला होता. यावेळी, त्याची जोडी कृष्णा अभिषेकसह जमली होती. दोघांचाही कॉमेडी अंदाज रसिकांच्या पंसतीस पात्र ठरला होता.

कॉमेडीच नाही तर आपल्या अभिनय कौशल्याने सुदेशन रसिकांची मनं जिंकली आहेत. सुदेश लाहिरीने अनेक पंजाबी सिनेमा आणि बॉलिवूड सिनेमांमध्येही काम केले आहे. 'रेडी', 'जय हो', 'टोटल धमाल', 'मुन्ना मायकेल', 'ग्रेट ग्रँड मस्ती' अशा सिनेमांतून त्याने अभिनय करत रसिकांचे मनोरंजन केले आहे.

 

Web Title: Sudesh lahri Selling Vegetables Funny Comedy Video Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.