ऐसी दिवानगी... देखी नही कभी या मालिकेतील प्रणव मिश्राने केला भयंकर स्टंट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2017 14:22 IST2017-06-16T08:52:15+5:302017-06-16T14:22:15+5:30
ऐसी दिवानगी.... देखी नही कभी या मालिकेद्वारे प्रणव मिश्राने छोट्या पडद्यावर पदार्पण केले आहे. या मालिकेची कथा खूप वेगळी ...

ऐसी दिवानगी... देखी नही कभी या मालिकेतील प्रणव मिश्राने केला भयंकर स्टंट
ऐ ी दिवानगी.... देखी नही कभी या मालिकेद्वारे प्रणव मिश्राने छोट्या पडद्यावर पदार्पण केले आहे. या मालिकेची कथा खूप वेगळी असून प्रेक्षकांना या मालिकेची कथा चांगलीच आवडत आहे. या मालिकेत एक आगळीवेगळी प्रेमकथा प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. एकमेकांपेक्षा स्वभावाने पूर्णपणे वेगळ्या असणाऱ्या नायक-नायिकेच्या तिरस्कार आणि प्रेमाची कथा प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळत आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येण्यापूर्वी या मालिकेचा म्युझिक व्हिडिओ प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या म्युझिक व्हिडिओमध्ये प्रेक्षकांना या मालिकेतील नायक-नायिकेची केमिस्ट्री अनुभवायला मिळाली होती. या व्हिडिओचे चित्रीकरण करण्यासाठी या मालिकेच्या टीमने खूप मेहनत घेतली आहे. या व्हिडिओचे चित्रीकरण करण्यासाठी प्रणव मिश्रा अक्षरशः आगीशी खेळला. या व्हिडिओचे चित्रीकरण मे महिन्यात भोरमध्ये करण्यात आले होते. या व्हिडिओचे चित्रीकरण दोन दिवस सुरू होते. चित्रीकरणाच्या पहिल्या दिवशी प्रणव त्याच्या नायिकेला म्हणजेच ज्योतीला उचलून 15 वेळा पायऱ्या चढला आणि उतरला. यामुळे त्याची पाठ चांगलीच दुखायला लागली होती. दुसऱ्या दिवशी त्याला बेधुंद होऊन घोड्याच्या पुढे पळायचे होते. पाठदुखी असल्याने त्याच्यासाठी हे सोपे नव्हते. पण तरीही त्याने तो सीन खूप चांगल्याप्रकारे दिला. एवढेच नव्हे तर गाण्याचा हिस्सा म्हणून प्रणवला जळते निखारे हाताने बाजूला करायचे होते. आम्ही एडिटिंगच्यावेळी जळते निखारे दाखवू असे मालिकेच्या टीमने सांगितले होते. पण दृश्य चांगल्या प्रकारे दिसावे यासाठी प्रणवने खरोखरच हाताने निखारे बाजूला केले. याविषयी प्रणव सांगतो, घोड्यांच्या पुढे पळताना मला खूपच त्रास होत होता. तसेच ज्योतीला अनेक वेळा उचलून घेतल्याने माझी पाठ खूप दुखायला लागली होती. पण तरीही दृश्य सगळी खरीखुरी दिसावीत यासाठी मी जळते निखारे हाताने बाजूला केले. यामुळे माझ्या तळहातावर फोडही आले. प्रेक्षकांना हा व्हिडिओ अतिशय आवडला याचा मला आनंद होत आहे.