​स्टडी कम्स फर्स्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2016 17:06 IST2016-10-14T09:14:10+5:302016-10-15T17:06:59+5:30

सिमरन परींजा काला टिका या मालिकेत कालीची भूमिका साकारत आहे. सिमरन सध्या मास मीडियाच्या तिसऱ्या वर्षाला आहे. सिमरन लहानपणापासूनच ...

Study Comes First | ​स्टडी कम्स फर्स्ट

​स्टडी कम्स फर्स्ट

मरन परींजा काला टिका या मालिकेत कालीची भूमिका साकारत आहे. सिमरन सध्या मास मीडियाच्या तिसऱ्या वर्षाला आहे. सिमरन लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार आहे. अभिनय ही तिची आवड असली तरी तिने नेहमीच अभिनय आणि शिक्षणामध्ये शिक्षणाला अधिक महत्त्व दिले आहे. आता सिमरन मालिकेत काम करत असली तरी चित्रीकरणाच्या दरम्यान मिळणाऱ्या वेळात ती अभ्यास करते. याविषयी सिमरन सांगते, "माझ्यासाठी शिक्षण हे सगळ्यात महत्त्वाचे आहे. मला माझ्या परीक्षेत चांगले गुण मिळवायचे आहेत. त्यामुळे माझी पुस्तके नेहमीच माझ्या बॅगमध्ये असतात. मी माझ्या दृश्याचे चित्रीकरण झाले की अभ्यास करत बसते. मला अभिनय आणि शिक्षण या दोन्ही गोष्टींमध्ये यश मिळवायचे आहे. त्यामुळे माझ्या परीक्षेला वेळ असला तरी मी रोज अभ्यास करते." 

Web Title: Study Comes First

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.