​ आरंभ मालिकेतील रजनीश दुग्गलला त्याच्या फॅनकडून मिळाली खास भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2017 11:38 IST2017-06-09T06:08:26+5:302017-06-09T11:38:26+5:30

आरंभ या मालिकेचे प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस आल्यापासूनच या मालिकेविषयी प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे. या मालिकेतील व्यक्तिरेखा, कलाकार ...

A special gift from Rajneesh Duggal from his fan in the inaugural series | ​ आरंभ मालिकेतील रजनीश दुग्गलला त्याच्या फॅनकडून मिळाली खास भेट

​ आरंभ मालिकेतील रजनीश दुग्गलला त्याच्या फॅनकडून मिळाली खास भेट

ंभ या मालिकेचे प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस आल्यापासूनच या मालिकेविषयी प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे. या मालिकेतील व्यक्तिरेखा, कलाकार सगळेच प्रेक्षकांना आकर्षित करत आहेत. त्याचसोबत या मालिकेतील कलाकारांची वेशभूषा, या मालिकेचा सेट या सगळ्याच गोष्टींचे कौतुक लोकांकडून होत आहे. या मालिकेत रजनीश दुग्गल प्रेक्षकांना वरुण देव या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. रजनीशने या मालिकेत काम करण्याआधी ‘१९२०’,‘एक पहेली लीला’,‘वजह तुम हो’ यांसारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे. त्यामुळे त्याचे फॅन फॉलॉविंग प्रचंड आहे. त्याच्या चाहत्यांमध्ये मुलींचे प्रमाण हे अधिक आहे. त्याचे चाहते त्याला नेहमीच काही ना काही तरी भेटवस्तू पाठवत असतात.
आरंभ या मालिकेच्या सेटवर काही दिवसांपूर्वी एक तरुणी आली होती. ती रजनीशची मोठी चाहती होती. ती खास त्यालाच भेटायला मालिकेच्या सेटवर आली होती. तिने रजनीशसोबत खूप साऱ्या गप्पा मारल्या. ती त्याच्यासाठी एक छानशी भेटवस्तू देखील घेऊन आली होती. तिने त्याला एक छानसे पेटिंग दिले. हे पेटिंग तिने स्वतः काढले होते. याविषयी रजनीश सांगतो, मी हे पेटिंग पाहाताच भारावून गेलो. ते अतिशय सुंदर होते. फॅनच्या प्रेमामुळेच तुम्हाला चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते असे मला वाटते. आजवर माझ्या चित्रपटातील सगळ्याच भूमिका माझ्या फॅन्सना आवडल्या आहेत. त्यांना माझी आरंभमधील भूमिका देखील आवडावी अशी माझी इच्छा आहे. कारण आजवर मी साकारलेल्या भूमिकांपेक्षा ही खूपच वेगळी भूमिका आहे.
या मालिकेत रजनीशसोबत कार्तिका नायर, तनुजा मुखर्जी, जॉय सेनगुप्ता यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 

Web Title: A special gift from Rajneesh Duggal from his fan in the inaugural series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.