पैशाची नाही मनाची श्रीमंती लागते, माधूरी दीक्षितची 'ही 'कामगिरी पाहून तुम्हालाही वाटेल कौतुकास्पद 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 08:52 PM2021-03-19T20:52:54+5:302021-03-19T20:54:28+5:30

Madhuri gifts dance deewane contestant. असलं तरी आपली मराठी मुलगीने छोट्या पडद्यावरील डान्स दीवाने शोमध्ये अशी काही कामगीरी केली की, सा-यांचे तिचे तोंडभरुन कौतुक करत आहेत. 

A special gesture: Madhuri Dixit gifts sarees to Dance Deewane contestant Uday Singh’s mother  | पैशाची नाही मनाची श्रीमंती लागते, माधूरी दीक्षितची 'ही 'कामगिरी पाहून तुम्हालाही वाटेल कौतुकास्पद 

पैशाची नाही मनाची श्रीमंती लागते, माधूरी दीक्षितची 'ही 'कामगिरी पाहून तुम्हालाही वाटेल कौतुकास्पद 

googlenewsNext

आपलं स्मित हास्य, आपल्या अदा, नृत्य आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभिनयातील जादू यामुळे मराठीच नाही तर कोट्यवधी रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेली, बॉलीवुडची धकधक गर्ल, मोहिनी अशी कितीतरी नावं कमी पडतील अशी अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित नेने. माधुरीने गेली २ दशकांहून अधिक काळ रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. मात्र आजही माधुरीला लक्षात घेऊन सिनेमाच्या कथा लिहल्या जातात. असं असलं तरी आपली मराठी मुलगीने छोट्या पडद्यावरील डान्स दीवाने शोमध्ये अशी काही कामगीरी केली की, सा-यांचे तिचे तोंडभरुन कौतुक करत आहेत. 

असे म्हणतात की जर तुम्ही स्वप्नाचा पाठलाग केलात तर ते खरे होऊ शकते, ही म्हण खऱ्या अर्थाने सार्थ ठरवली आहे कलर्सच्या डान्स दीवाने सीझन ३चा स्पर्धक उदय सिंगच्या प्रवासाने. निमूच गावातील तो 23 वर्षांचा मुलगा आहे आणि त्याने सर्व अडथळ्यांवर मात केली आहे आणि त्याच्या टॅलेंटच्या मेरीटवर डान्स दीवाने मंचावरआज त्याने स्वतःला सिद्ध केले आहे.  त्याची स्वप्ने पूर्ण करण्याची त्याची तीव्र इच्छा आहे. डान्स दीवानेसाठी परफॉर्म केल्यानंतर त्याचे जीवन कसे बदलले यासाठी उदय नेहमीच कृतज्ञता व्यक्त करतो. आणि त्याच्या जीवनात प्रथमच काही गोष्टींचा त्याने अनुभव घेतला आहे हे सुध्दा मोठ्या कौतुकाने सांगतो.

डान्स दीवानेच्या शेवटच्या एपिसोडमध्ये, टीमने त्याच्या नीमच मधील शेजाऱ्यांसाठी त्याच्या मेगा ऑडिशनच्या विशेष स्क्रीनिंगची व्यवस्था केली आणि आगामी एपिसोडमध्ये टीम जुहू बीचला त्याच्या सोबत भेट देऊन त्याला चकित केले. डान्स दीवानेकडे खरेच टॅलेंट शोधण्याची नजर आहे आणि त्यांनी उदयला त्याचे स्वप्न पूर्ण कऱण्याकडे नेण्यासाठी त्यांनी शक्य ते सर्व केले.

परीक्षकांना उदय आणि त्याच्या आईची आर्थिक स्थिती लक्षात आल्यानंतर माधुरी दीक्षितने त्याच्या आई साठी काहीतरी विशेष भेटवस्तून देण्याच ठरवले.उदयच्या आईला नव्या साड्या भेट दिल्या, यावेळी उदयच्या आईच्या चेह-यावर आनंदाचे भाव उमटल्याचे पाहायला मिळाले. 

Web Title: A special gesture: Madhuri Dixit gifts sarees to Dance Deewane contestant Uday Singh’s mother 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.