‘इंडियन आयडल 12’च्या वादात सोनू निगमने घेतली अमित कुमार यांची बाजू, शेअर केला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 10:31 AM2021-06-02T10:31:00+5:302021-06-02T10:32:11+5:30

Indian Idol 12 Controversy : ‘इंडियन आयडल 12’ सध्या एक ना अनेक वादांमुळे  चर्चेत आहे. आता या वादात बॉलिवूड सिंगर सोनू निगम याने उडी घेतली आहे.

sonu nigam support amit kumar on indian idol 12 controversy | ‘इंडियन आयडल 12’च्या वादात सोनू निगमने घेतली अमित कुमार यांची बाजू, शेअर केला व्हिडीओ

‘इंडियन आयडल 12’च्या वादात सोनू निगमने घेतली अमित कुमार यांची बाजू, शेअर केला व्हिडीओ

googlenewsNext
ठळक मुद्देलोकप्रिय गायक किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार यांनी ‘इंडियन आयडल 12’च्या ‘किशोर कुमार एपिसोड’मध्ये हजेरी लावली होती.

‘इंडियन आयडल 12’ (Indian Idol 12) सध्या एक ना अनेक वादांमुळे  चर्चेत आहे. आता या वादात बॉलिवूड सिंगर सोनू निगम  (Sonu Nigam) याने उडी घेतली आहे. सोनूने किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार (Amit Kumar) यांची बाजू घेत, शोचा होस्ट आदित्य नारायण व गीतकार मनोज मुंतशीर यांना लक्ष्य केले आहे.
सोनूने एक व्हिडीओ शेअर केलाये. ‘इंडियन आयडल व अमित कुमार यांच्यासंदर्भाने एक संदेश,’ या कॅप्शनसह सोनूने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

व्हिडीओत सोनू म्हणतो, ‘इंडियन आयडलवरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. मी यावर शांत होतो, पण आता मला वाटतंय की, मी यावर बोलायला हवे. अमित कुमार यांना कोण ओळखत नाही, खूप महान व्यक्तिमत्त्व, किशोर कुमार यांचे चिरंजीव. माझ्या मते, अमित कुमार यांच्या वक्तव्याला चुकीच्या पद्धतीने मांडले गेले. अमित कुमार खूप साधे व सभ्य व्यक्ति आहेत. ते काहीही बोलत नाहीत म्हणून तुम्ही लोक त्याचा फायदा घेत आहे. मी इंडियन आयडलच्या टीमला सांगू इच्छितो की, त्यांनी हा वाद निकाी काढावा. ना इंडियन आयडलची चूक आहे, ना अमितजींची चूक आहे. यात चूक या वादात उडी घेणा-या लोकांची आहे. मनोज मुंतशीर व आदित्य यासारख्यांची. अमित कुमार खूप सीनअर आहेत आणि आपल्या इंडस्ट्रीत सीनिअर व्यक्तिंचा आदर केला जातो.’

काय म्हणाले होते अमित कुमार?

  लोकप्रिय गायक किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार यांनी ‘इंडियन आयडल 12’च्या ‘किशोर कुमार एपिसोड’मध्ये हजेरी लावली होती. परंतु, या भागावर प्रेक्षकांनी जोरदार टीका केल्यानंतर अमित यांनी देखील कार्यक्रमाबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले होते. स्पर्धकांनी किशोर कुमार यांना ट्रिब्यूट दिला होता. परंतु, हा भाग प्रेक्षकांना खास पसंत पडला नव्हता. या पार्श्वभूमीवर अमित यांनीही कार्यक्रमाचा हा भाग त्यांना आवडला नसल्याचे म्हटले होते. ‘मला सांगण्यात आले की सगळ्यांचे कौतुक करायचे आहे. मग ते कसेही गायले तरीही त्यांचे कौतुकच करायचे. कारण हा भाग किशोर कुमार यांच्या गाण्यांवर असणार आहे. मी तेच केलं जे मला करण्यासाठी सांगण्यात आले, असे अमित कुमार म्हणाले होते.

अमितजींनी आधी सांगायचे होते...
अमितजींच्या आरोपांना आदित्य नारायणने प्रत्युत्तर दिले होते. अमितजी याआधीही अनेकदा आमच्या शोमध्ये आले आहेत. प्रत्येकवेळी त्यांनी खूप एन्जॉय केले. या एपिसोडमध्येही त्यांनी किशोर दांच्या अनेक आठवणी, त्यांचे अनेक किस्से शेअर केलेत. स्पर्धकांचे कौतुक केले. शूट सुरु असताना काही गोष्टींबद्दल त्यांची नाराजी होती तर त्यांनी तेव्हाच ती सांगायला हवी होती, कदाचित त्यांच्या सल्ल्यानुसार आम्ही ऐनवेळी काही बदलही केले असते, असेही आदित्य म्हणाला होता.

Web Title: sonu nigam support amit kumar on indian idol 12 controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.