n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small; line-height: normal;">बॉलिवुडचा प्रसिद्ध गायक सोनू निगमने नुकतेच नागार्जुन - एक योद्धा या मालिकेसाठी एक गाणे गायले. या मालिकेत आतापर्यंत अनेक गाणी आपल्याला ऐकायला मिळाली आहेत. या सगळ्या गाण्यांचे संगीतदिग्दर्शन जीत गांगुलीने केले आहे. सिद्धार्थ महादेवन, जुबीन नौटियाल आणि पलक मुच्छाल यांनी ही गाणी गायली होती. नुकतेच सोनू निगमने या मालिकेसाठी एक गाणे रेकॉर्ड केले. कैसी ये पहेली...क्या पता हे सोनूने गायलेले गाणे त्याला खूपच आवडले. तो सांगतो, "हे गाणे जीतची पत्नी चंद्राणी गांगुलीने लिहिले आहे. या गाण्याला एकच अंतरा होता. पण हे गाणे मला खूप आवडल्याने मी चंद्राणीला आणखी एक अंतरा लिहिण्याची विनंती केली. तिचे हे गाणे लिहून झाल्यावर मी पुन्हा ते रेकॉर्ड करणार आहे."
Web Title: Sonu Gale for the series
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.