किचनमध्ये जेवण करताना दिसणार सोनाली कुलकर्णी, पण कधी आणि कुठे ते वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2021 17:51 IST2021-12-10T17:45:32+5:302021-12-10T17:51:11+5:30
पाक-कौशल्य दाखवण्याचं शिवधनुष्य सोनाली कुलकर्णी (Sonalee kulkarni ) उचलणार आहे.

किचनमध्ये जेवण करताना दिसणार सोनाली कुलकर्णी, पण कधी आणि कुठे ते वाचा
कलाकार म्हटले म्हणजे प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन होणार हे नक्की पण कलाकार आणि किचन हे समीकरण नेहमीच जमेल असं नाही. त्यामुळे या कलाकारांना जर किचनमध्ये काही पदार्थ करायला लावला तर ते त्यात कितपत यशस्वी होतील हे आता प्रेक्षकांना देखील कळणार आहे झी मरा)ठीवरील किचन कल्लाकार या कार्यक्रमातून. या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात सोनाली कुलकर्णी (Sonalee kulkarni ), नागराज मंजुळे (nagraj manjule) आणि आकाश ठोसर (akash thosar) या कलाकारांचा किचनमध्ये कस लागणार आहे. त्यांच्या जोडीला जयंती कठाळे ह्या शेफ देखील कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. आता हे सर्व कलाकार किचन मध्ये कसा कल्ला करणार हे पाहणं औत्सुक्याच ठरणार आहे.
या बद्दल बोलताना अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणाली, "शूटिंगमधून वेळ काढून किचनमध्ये जास्त वेळ देणं शक्य होत नाही पण किचन कल्लाकार या कार्यक्रमामध्ये पाक-कौशल्य दाखवण्याचं शिवधनुष्य आम्ही कलाकार पेलवणार आहोत. यात आमची तारांबळ उडणार आहे पण यात प्रेक्षकांचं भरघोस मनोरंजन होईल आणि त्यांना आमचा हा वेगळा पैलू बघताना देखील मजा येईल."
अलीकडेच सोनालीचा पांडू सिनेमा अलिकडेच रिलीज झाला आहे. विजू माने दिग्दर्शित चित्रपटात सोनासी सह भाऊ कदम आणि कुशल बद्रिके मुख्य भूमिकेत आहेत. पांडू' या चित्रपटात दोन मित्रांची कथा उलगडली जाणार आहे. पांडू आणि महादू हे कोल्हापूरचे लोककलावंत. वगनाट्यातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचं काम दोघेही करतायत.