इंडियन आयडल 10 च्या सेटवर सोनाक्षी सिन्हाने घेतली ही शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 06:00 IST2018-08-10T14:42:54+5:302018-08-11T06:00:00+5:30

हॅपी फिर भाग जाएगी या चित्रपटाचे कलाकार सोनाक्षी सिन्हा आणि जस्सी गिल नुकतेच इंडियन आयडलच्या सेटवर उपस्थित होते, त्यावेळी सोनाक्षीने एक शपथ या कार्यक्रमाच्या सेटवर घेतली.

Sonakshi Sinha took oath on Indian Idol 10 set | इंडियन आयडल 10 च्या सेटवर सोनाक्षी सिन्हाने घेतली ही शपथ

इंडियन आयडल 10 च्या सेटवर सोनाक्षी सिन्हाने घेतली ही शपथ

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा अलीकडेच इंडियन आयडल 10 च्या सेटवर आली होती. त्यावेळी तिने सांगितले की, तिने आपले डोळे दान करण्याची शपथ घेतली आहे. तिने ही शपथ इंडियन आयडलच्या सेटवर घेण्यामागे एक खास कारण होते.

इंडियन आयडल 10 च्या सर्वोत्कृष्ट 13 स्पर्धकांपैकी एक स्पर्धक हिमाचल प्रदेशचा अंकुश भारद्वाज आहे. या अष्टपैलू स्पर्धकाला भेटून सोनाक्षी सिन्हा खूप खूश झाली होती. या गायकाचा निर्धार आणि दृढता पाहून ही दबंग अभिनेत्री खूप प्रभावित झाली होती. अंकुश भारद्वाज आपले प्रसिद्ध गायक बनण्याचे स्वप्न जगत आहे. त्याची दृष्टी हळूहळू हरवत चालली असली तरी तो आपले हे दुःख विसरून दर आठवड्याला आपल्या जादुई परफॉर्मन्सने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. हॅपी फिर भाग जाएगी या चित्रपटाचे कलाकार सोनाक्षी सिन्हा आणि जस्सी गिल नुकतेच इंडियन आयडलच्या सेटवर उपस्थित होते आणि अंकुशची कहाणी ऐकून सोनाक्षी हेलावून गेली. या अभिनेत्रीने हे सगळे ऐकून आपले डोळे दान करण्याचे ठरवले आणि तिने सर्वांना नेत्रदान करण्याची विनंती केली. याविषयी सोनाक्षी सिन्हा सांगते, “आपल्या वेदनेची पर्वा न करता ज्या प्रकारे अंकुश मंचावर परफॉर्म करत आहे, ते कौतुकास्पद आहे. या ठिकाणी मला हे नमूद करावेसे वाटते की, मी माझे डोळे दान करणार आहे, जेणेकरून एखाद्या व्यक्तीला माझ्यामुळे दृष्टी मिळू शकेल. हा उदात्त विचार करून प्रत्येकाने ही शपथ घेतली पाहिजे असा आग्रह मी करीन. अंकुशसारख्या सकारात्मक लोकांना भेटून आनंद होतो, जे विपरीत परिस्थितीत देखील डगमगत नाहीत. तो खरोखर धैर्यशाली आहे आणि इंडियन आयडलच्या मंचावर परफॉर्म करून तो ज्या प्रकारे श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत आहे ते खरोखर कौतुकास्पद आहे.”

सोनाक्षीने मंचावर जाऊन अंकुश गात असलेल्या ‘मस्त मस्त दो नैन’ या गीतावर त्याच्यासोबत नृत्य देखील सादर केले. देखण्या अंकुशला तिच्यासोबत नृत्य करताना खूप मजा आली असे त्याने सांगितले. 

Web Title: Sonakshi Sinha took oath on Indian Idol 10 set

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.