'कुछ रंग प्यार के ऐसे भी' मालिकेतील या टीव्ही कपलने गुपचुप उरकला साखरपुडा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2017 10:31 IST2017-10-26T05:01:37+5:302017-10-26T10:31:37+5:30
छोट्या पडद्यावर 'कुछ रंग प्यार के ऐसे भी' या मालिकेत देव आणि सोनाक्षी या दोघांची केमिस्ट्री रसिकांना चांगली भावली. ...

'कुछ रंग प्यार के ऐसे भी' मालिकेतील या टीव्ही कपलने गुपचुप उरकला साखरपुडा!
छ ट्या पडद्यावर 'कुछ रंग प्यार के ऐसे भी' या मालिकेत देव आणि सोनाक्षी या दोघांची केमिस्ट्री रसिकांना चांगली भावली. मालिकेत देवची भूमिका शाहिर शेख आणि सोनाक्षीची भूमिका एरिका फर्नांडिसने साकारली होती. ऑनस्क्रीन या दोघांची लव्ह स्टोरीची सुरुवात थोडी भांडणं, थोडं रुसवा, थोडा फुगवा यापासून सुरुवात झाली.सुरुवातीला एकमेंकांशी भांडणारे हे कपल अनाहूतपणे एकमेकांच्या प्रेमात कसे पडतात हे मालिकेत दाखवण्यात आले होते.देव आणि सोनाक्षी यांच्या मालिकेत दिसणारी केमिस्ट्रीही रसिकांना खूप भावली.मालिकेत एक से बढकर एक रंजक वळणामुळे या मालिकेने अल्पावाधीत रसिकांची पसंती मिळवली होती. मात्र मालिकेत देव( शाहिर शेख ) सोनाक्षी(एरिका फर्नांडिस) यांच्या लग्नाच्या ट्रॅकनंतर काही भागांनी ही मालिका संपवण्यात आली. मालिका संपून आता वर्षझाले असले तरीही देव आणि सोनाक्षी एकमेकांच्या संपर्कात होते. मुळात मालिकेच्या सेटवरच या दोघांमध्ये रियल लाइफ लव्ह स्टोरी रंगत असल्याचं पाहायला मिळाले.दोघंही एकमेकांना पसंत करत असून बराच काळ एकत्र घालवायचे.शाहिर आणि एरिका यांच्यातील या प्रेमाच्या नात्याची आणि दोघंही एकत्र बराच काळ घालवत असल्याची कल्पना मालिकेच्या सेटवरही प्रत्येकालाच आली होती.एक उत्तम सहकलाकार म्हणून तिच्यासोबत काम करायला मज्जा येते आणि आपण फक्त चांगले मित्र आहोत असं शाहिरने सांगितले होते.
मात्र ही मालिका संपल्यानंतरही देव म्हणजेच शाहिर शेख आणिर सोनाक्षी म्हणजेच एरिका फर्नांडीज दोघंही एकमेकांसह वेळ घालवताना दिसले. दोघेही एकमेकांना पसंत करत असून दोघांच्या प्रेमाच्या गोष्टी चांगल्याच रंगल्या असताना आता आणखीन एक गोष्टीची चर्चा सुरू आहे. दोघांमधील हे प्रेमाचं नातं दिवसेंदिवस आणखी घट्ट बनत चाललं आहे. निव्वळ मैत्री या शब्दांपलीकडे या दोघांच्या नात्याकडे पाहिलं जात आहे. आता हे कपल लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचे कळतंय. इतकेच नाहीतर शाहिर आणि एरिका यांनी गुपचुप साखरपुडा केला असल्याचे बोलले जात आहे. नपकतेच शाहिरने इन्स्टाग्रामवर शेअर कलेल्या फोटोंमध्ये त्याने पहिल्यांदाच उघडपणे त्यांच्या प्रेमाची कबुली दिली आहे. या दोघांच्या साखरपुड्याला जवळचे मित्र मैत्रिणीही उपस्थित होते .इतकेच नव्हे तर शाहिरची ऑनस्क्रीन आईची भूमिका साकारलेली अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकरही या दोघांना आशिर्वाद देण्यासाठी त्यांच्या साखरपुड्याला उपस्थित होत्या. हे दोघेही एकमेकांसाठी खूप स्पेशल असल्याची कबूली दोघांनीही दिली असली तरी एरिकाने मात्र साखरपुडा झाला नसल्याचे सांगितले आहे.नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत एरिकाने सध्या ज्या चर्चा होत आहे त्या सगळ्या खोट्या असल्याचे सांगितले आहे.दोघांनी एकमेकांबद्दल असलेले प्रेम काही ते जगापासून लपवून राहिले नसले तरीही आता हे दोघे कधी रेशीमगाठीत अडकणार याकडेच दोघांच्याही फॅन्सचे लक्ष लागले असणार हे मात्र नक्की.
Also Read:'कुछ रंग प्यार के ऐसे भी' या मालिकेचा दुसरा सिझन लवकरच!