म्हणून मराठी बिग बॉस घरात उषा नाडकर्णी पडल्या एकट्या?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2018 12:34 IST2018-04-18T07:04:39+5:302018-04-18T12:34:39+5:30

बिग बॉस मराठी रहिवाशी संघामध्ये आता खऱ्या अर्थाने सुरु झाला माइंड गेम. घरामध्ये झालेल्या नॉमिनेशन प्रक्रीयेमुळे नक्की कोण कोणासोबत ...

So Usha Nadkarni was alone in Marathi Big Boss house? | म्हणून मराठी बिग बॉस घरात उषा नाडकर्णी पडल्या एकट्या?

म्हणून मराठी बिग बॉस घरात उषा नाडकर्णी पडल्या एकट्या?

ग बॉस मराठी रहिवाशी संघामध्ये आता खऱ्या अर्थाने सुरु झाला माइंड गेम. घरामध्ये झालेल्या नॉमिनेशन प्रक्रीयेमुळे नक्की कोण कोणासोबत आहे ? आणि कोण कोणाच्या विरोधात आहे हे काही प्रमाणामध्ये स्पष्ट झालेले आहे. उषाजी त्यांच्या झालेल्या नॉमिनेशन मुळे घरातील सदस्यांवर काही प्रमाणात नाराज आहेत.आणि हि नाराजगी त्यांनी घरच्यांसमोर व्यक्त करायला सुरुवात झाली आहे.उषा नाडकर्णी आणि अनिल थत्ते यांमध्ये असलेले वाद आता विकोपाला पोहचले असून त्यामध्ये नॉमिनेशन प्रक्रिया आल्यामुळे घरामध्ये नाराजीचे वातावरण आहे.घरामध्ये सकाळी एकीकडे फिटनेसची रेसिपी रंगत असताना तिकडे आत घरात आरती आणि उषाताई यांच्यात चपात्या बनवण्यावरून खटके उडत होते. याचा परिणाम उषाताई चपात्या न बनवता निघून गेल्या. घरातून बाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये उषाजींना नॉमीनेट केल्यामुळे त्यांना आश्चर्याचा धक्का बसला आणि त्यांनी घरातील ईतर सदस्यांना टोंबणे मारण्यास सुरुवात केली. घरातील सगळ्यांना माझी भीती वाटेत म्हणूनच मला नॉमिनेट केले असा त्यांनी घरच्या सदस्यांवर आरोप लावला.घरामध्ये सगळ्यांनी आपआपले ग्रुप केले आहेत आणि ते मला समजत आहे असे देखील त्यांनी ऐकवून दाखवले. थोडक्यात आरतीला उद्देशून उषाजींनि लेकी बोले सुने लागे हि खेळी त्यांनी सुरु केली आहे.हे सगळे होत असताना उषा ताई बिग बॉसचं घरामध्ये एकट्या तर पडल्या नाही ना ? हा प्रश्न नक्कीच प्रेक्षकांना पडेल.




बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सकाळी सकाळी उठल्यानंतर घरामध्ये रहाणाऱ्या रहिवाश्यांची दिनचर्या सुरु होते.कोण नाश्ता बनवत तर कोणी योगासने करतात तर कोणी व्यायाम  करतात.बिग बॉस मराठी च्या पहिल्या सिझनमधील सगळेच कलाकार फिटनेस फ्रिक असल्याचे कळत आहे.कारण बऱ्याच वेळ हे योगा आणि व्यायाम  करताना दिसतात. या सगळ्या स्पर्धकांचा गुरु आहे सगळ्यांचा लाडका अभिनेता राजेश शृंगारपुरे. कारण,सकाळीच फिटनेस गुरु राजेश शृंगारपुरे यांनी घरातल्या इतर मंडळीना १०० दिवस कसे फिट राहावे याचा कानमंत्र देताना आपल्याला दिसणार आहे.

Web Title: So Usha Nadkarni was alone in Marathi Big Boss house?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.