म्हणून कॉमेडीयन भारती सिंहने कपिल शर्माची सोडली साथ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2017 12:09 IST2017-07-31T06:30:01+5:302017-07-31T12:09:03+5:30
गेल्या काही महिन्यांपासून कपिल शर्मा चांगलाच चर्चेत आहे. इतकच नाही तर कपिल शर्मा शो बंद होणार असल्याच्या बातम्या दिवसेंदिवस ...

म्हणून कॉमेडीयन भारती सिंहने कपिल शर्माची सोडली साथ
ग ल्या काही महिन्यांपासून कपिल शर्मा चांगलाच चर्चेत आहे. इतकच नाही तर कपिल शर्मा शो बंद होणार असल्याच्या बातम्या दिवसेंदिवस जोर धरू लागल्या आहेत. दिवसेंदिवस कपिल शर्माच्या शोचा घसरत्या टीआरपीमुळे या शोचे भवितव्य टांगणीला लागल्याच्या चर्चा सुरू असताना दुसरीकडे कपिलला कोणीही साथ देण्याच्या तयारीत दिसत नाहीय.कपिलच्या शोमध्ये कपिल एकटा पडल्यानंतर भारती सिंह येणार या बातमीनेच पुन्हा त्याचा शो ट्रॅकवर येईल असे वाटले होते. तसे घडले ही पण भारती सिंहची या शोमध्ये एंट्री ही फक्त चार एपिसोड पुरतीच मर्यादित होती.चार एपिसोड नंतर भारतीनेही या शोमधून एक्झिट घेतली.भारतीने शो सोडल्यानंतर पुन्हा नव्या चर्चांना उधाण आलं होतं.कपिलचे भारती सिंहसह खटके उडत असल्याच्या अफवा पसरत होत्या.यांवर कपिलकडून कोणतंही उत्तर देण्यात आलं नव्हतं. त्यामुळे सत्य हे बाहेर आलेच नाही.मात्र आज आम्ही तुम्हाला भारतीने इतर मित्रांप्रमाणे कपिलचा शो का सोडला याचे कारण सांगणार आहोत. होय, लवकरच भारती अनु मलिकसह आपला एक नवा कॉमेडी शो आणण्याच्या तयारीत आहे. जेव्हा स्वतःचा कॉमेडी शो सुरू होणार म्हटल्यावर ती का म्हणून कपिलच्या शोमध्ये काम करणार. हे तर साधी सरळ गोष्ट आहे. त्यामुळे तिच्या शोच्या शूटिंग साठी तिने कपिल शर्मा शो सोडला आणि 'कॉमेडी दंगल' शोच्या शूटिंगमध्ये बिझी झाली.भारतीने एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की,'कॉमेडी दंगल' शो सुरू होण्यापूर्वी कॉमेडी शर्मासह तसा मी करार केला होता.फक्त काही एपिसोडच कपिल शर्मा शो करणार असल्याचे आधीच ठरलं होतं.त्यानुसार मी शोचे चार एपिसोड केले. मात्र कपिल आणि भारती दोघांमध्ये काही तरी बिनसल्यामुळे हा शो सोडल्याच्या चर्चा आहेत तर त्या निव्वळ अफवा असल्याचे तिने म्हटले आहे. इतकचे नाहीतर भारतीच्या आगामी शोचे प्रोमोही टीव्हीवर झळकु लागले आहेत.
गेल्याच महिन्यात कॉमेडीयन कृष्णा अभिषेकने 'द ड्रामा कंपनी' नावाचा शो सुरू केला आणि आता भारती सिंह 'कॉमडी दंगल' हा नवा शो सुरू करणार म्हटल्यावर 'कपिल शर्मा शो' किती रसिकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरणार हे पाहणे रंजक ठरणार आहे.
गेल्याच महिन्यात कॉमेडीयन कृष्णा अभिषेकने 'द ड्रामा कंपनी' नावाचा शो सुरू केला आणि आता भारती सिंह 'कॉमडी दंगल' हा नवा शो सुरू करणार म्हटल्यावर 'कपिल शर्मा शो' किती रसिकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरणार हे पाहणे रंजक ठरणार आहे.