स्नेहा वाघ चक्कर येऊन पडली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2017 17:28 IST2017-05-26T11:58:43+5:302017-05-26T17:28:43+5:30

अभिनेत्यांचे आयुष्य म्हणजे प्रसिध्दी, वलय आणि आनंद असेच असते अशीच बहुतेकांची समजूत असते. पण ही प्रसिध्दी, वलय आणि पैसा ...

Sneha tiger fell dizzy! | स्नेहा वाघ चक्कर येऊन पडली!

स्नेहा वाघ चक्कर येऊन पडली!

िनेत्यांचे आयुष्य म्हणजे प्रसिध्दी, वलय आणि आनंद असेच असते अशीच बहुतेकांची समजूत असते. पण ही प्रसिध्दी, वलय आणि पैसा मिळविण्यासाठी या कलाकारांना कठोर परिश्रम करावे लागतात आणि कधी कधी त्याचा त्यांच्या प्रकृतीवर विपरित परिणामही होतो, हे फारच थोड्य़ांना ठाऊक असते. ‘लाईफ ओके’वरील ‘शेर-ए- पंजाब : महाराजा रणजितसिंग’ या ऐतिहासिक मालिकेत रणजितसिंग यांची आई राज कौर यांची भूमिका रंगविणारी अभिनेत्री स्नेहा वाघ ही अलीकडेच या मालिकेच्या सेटवर चक्कर आल्यामुळे कोसळली. या मालिकेत तिची भूमिका फारच महत्त्वाची असल्याने स्नेहा वाघला सतत चित्रीकरण करीत राहावे लागते. मालिकेच्या बहुतांशी प्रसंगांमध्ये ती उपस्थित असते. या भूमिकेसाठी तिला तब्बल 20 किलो वजनाचा पोशाख परिधान करावा लागतो. हे जड कपडे घालून वावरणारी स्नेहा अतिशय थकून गेली होती आणि वाढत्या उन्हाळ्य़ामुळे तिच्या शरीरातील पाणी खूपच कमी झाले होते. त्यातच तिला अन्नातून विषबाधा झाल्याने तिची प्रकृती अधिकच नाजूक बनली. या घटनेविषयी स्नेहाला विचारले असता ती म्हणाली, “आता उन्हाळा तीव्र होत असून असा जड पोशाख घालून चित्रीकरण करणं हे फारच त्रासदायक काम आहे. वाढत्या उन्हामुळे मला चक्कर येऊ लागली आणि काही काळ मी बेशुध्द पडले. तेव्हा मी अन्नातील विषबाधेतून सावरत असल्याने माझी प्रकृती तितकीशी चांगली नव्हती. सुदैवाने मला चांगले सहकारी आणि कर्मचारी मिळाले असून त्यांनी मला शेजारच्या खोलीत नेऊन झोपवलं आणि तातडीने डॉक्टरला बोलावलं. त्यानंतर ते मला सतत काहीतरी प्यायला देत होते, त्यामुळे मी त्यातून सावरले.”

Web Title: Sneha tiger fell dizzy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.