संगीतकार राम शंकर यांची मुलगी स्नेहा शंकर 'दी व्हॉईस इंडिया किड्स सिझन २' मध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2017 09:51 AM2017-11-09T09:51:59+5:302017-11-09T15:29:07+5:30

देशाच्या कानाकोपऱ्यातील गायन प्रतिभा दाखविण्याची आणि प्रोत्साहित करण्याची 'दी व्हॉईस इंडिया किड्स सिझन २' ची योजना आहे. तुम्ही सेलिब्रिटी ...

Sneha Shankar, daughter of composer Ram Shankar, in The Voice India Kids Season 2 | संगीतकार राम शंकर यांची मुलगी स्नेहा शंकर 'दी व्हॉईस इंडिया किड्स सिझन २' मध्ये

संगीतकार राम शंकर यांची मुलगी स्नेहा शंकर 'दी व्हॉईस इंडिया किड्स सिझन २' मध्ये

googlenewsNext
शाच्या कानाकोपऱ्यातील गायन प्रतिभा दाखविण्याची आणि प्रोत्साहित करण्याची 'दी व्हॉईस इंडिया किड्स सिझन २' ची योजना आहे. तुम्ही सेलिब्रिटी असा किंवा सामान्य माणूस, या स्टेजवर केवळ उत्तम आवाज असणा-यांनाच संधी मिळते. ‘दी व्हॉईस इंडिया किड्स’ मधून प्रख्यात बॉलिवुड संगीतकार राम शंकर यांची मुलगी स्नेहा शंकर टेलिव्हिजनवर पदार्पण करत आहे. 'बिच्छू', 'दुल्हे राजा' आणि 'परदेसी बाबू'सारख्या नावाजलेल्या सिनेमांसाठी त्यांनी काम केले आहे. राम शंकर यांनी संगीत क्षेत्रात ३५ वर्षे दिली आणि आता त्यांची मुलगी त्यांच्या पावलावर पाऊल टाकताना दिसते आहे. 

यासंदर्भात माहिती देताना ते म्हणाले, “या शो मध्ये स्नेहा (माझी मुलगी) सहभागी होत आहे याचा मला खूप आनंद होतो आहे कारण मुलांच्या आवाजाच्या क्षमतेवरच इथे प्रशिक्षक मुलांची निवड करतात. ‘दी व्हॉईस इंडिया किड्स’ एक असे व्यासपीठ आहे जिथे ती तिचे खरे गुण, तिची विविधता आणि तिच्‍या वयाकडून असणा-या अपेक्षांपेक्षा आपण अधिक आहोत, हे दाखवून देऊ शकेल. स्नेहा आणि तिच्या गाण्याविषयी प्रशिक्षक नक्की काय सांगतात हे बघण्यासाठी मी उत्सुक असून आता जास्त वाट नाही बघू शकत. मला असेही वाटते की, या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनान्वये स्नेहा खूप काही शिकेल आणि चांगली प्रगती करू शकेल. मला खात्री आहे की, स्नेहा आताही आणि पुढेही आम्हाला नेहमीच तिचा अभिमान वाटावा असे वागेल.”  स्नेहा तिच्या वडिलांना अभिमानित करेल का, ती खुर्ची फिरवू शकेल का? 
 
या कार्यक्रमात परीक्षकांच्या भूमिकेत हिमेश रेशमिया; हसतमुख आणि अद्वितीय प्रतिभेचा गायक शान, भावविभोर आवाजाचा गायक आणि संगीतकार पापोन आणि सर्वात तरुण प्रशिक्षक बनलेली गायिका पलक मुछल दिसणार आहेत. या स्पर्धेत ७ ते १४ या वयोगटातील मुले आपल्या आवाजाच्या जोरावर प्रशिक्षकांना मंत्रमुग्ध होण्यास भाग पाडणार आहेत. अभिनेता व सूत्रसंचालक जय भानुशाली व त्याचा साथीदार निहार गिते हे दोघे या कार्यक्रमाची रंगत वाढविणार आहेत. बडे मियां आणि छोटे मियां म्हणावे अशी त्यांची  कामगिरीही आवर्जून पहावी अशीच असणार आहे.  

Web Title: Sneha Shankar, daughter of composer Ram Shankar, in The Voice India Kids Season 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.