​ऐश्वर्या रायसोबत दिसणारी ही बालकलाकार सध्या गाजवतेय छोटा पडदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2018 10:11 IST2018-05-07T04:41:09+5:302018-05-07T10:11:09+5:30

जेनिफर विंगेटने कुसूम, कसोटी जिंदगी की, शाका लाका बूम बूम कही तो होगा यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. ...

The small screen currently being played with Aishwarya Rai | ​ऐश्वर्या रायसोबत दिसणारी ही बालकलाकार सध्या गाजवतेय छोटा पडदा

​ऐश्वर्या रायसोबत दिसणारी ही बालकलाकार सध्या गाजवतेय छोटा पडदा

निफर विंगेटने कुसूम, कसोटी जिंदगी की, शाका लाका बूम बूम कही तो होगा यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. जेनिफरला लहानपणापासून अभिनयाचे वेड होते. तिच्या शाळेतल्या कार्यक्रमांमध्ये जेनिफर आवडीने भाग घेत. अभिनयाची आवड पुढे तिची करिअर बनले. तिने वेगळ्या मालिकांमध्ये विविधारंगी भूमिका साकारल्याला. जेनिफरने खूपच कमी वयात तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. अकेले हम अकेले तुम, राजा की आयेगी बरात, राजा को रानी से प्यार हो गया, कुछ ना कहो यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने बालकलाकाराची भूमिका साकारली आहे. कुछ ना कहो या चित्रपटात अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय यांच्यासोबत काम केले होते. सध्या सोशल नेटवर्किंगला एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये आपल्याला ऐश्वर्या रायसोबत छोटीशी जेनिफर पाहायला मिळत आहे. या चित्रपटात जेनिफरने ऐश्वर्याच्या लहान बहिणीची भूमिका साकारली होती. 
सध्या जेनिफर बेपनाह या मालिकेत झोया नावाची भूमिका साकारतेय. याआधी काही महिन्यांपूर्वी बेहद या मालिकेत तिने साकारलेल्या माया या भूमिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. 'बेहद' या मालिकेसाठी तिला एका दिवसाचे एक लाख रुपये इतके मानधन मिळत होते. त्यामुळे ती टीव्ही इंडस्ट्रीमध्ये सगळ्या जास्त फीस घेणारी अभिनेत्री ठरली आहे.  जेनिफर सध्या तिच्या मॅरिटल लाईफमुळेही खूप चर्चेत आहे. कारण जेनिफरने करणसिंग ग्रोवरसह लग्न केले होते. मात्र काही कारणामुळे त्यांचे बिनसले आणि दोघांनी काडीमोड घेत वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर करणने बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासूसह लग्न करत आपला वेगळा संसार थाटला. करण सिंगचे बिपाशा बासुसह असलेल्या लव्ह अफेअरमुळे जेनिफरने करण सिंगला घटस्फोट दिला होता. 
काही दिवसांपूर्वी जेनिफर विंगेटने तिचा लहानपणीचा एक फोटो सोशल मीडियावर अपडेट केला होता. या शेअर केलेल्या फोटोत जेनिफर मैत्रिणींसह एका कार्यक्रमात एन्जॉय करताना दिसत होती. या फोटोत जेनिफर खुपच क्युट दिसत होती. सोशल मीडियावर हा फोटो शेअर होताच तिच्या फोटोला खूप साऱ्या कमेंट आणि लाईक्स मिळाल्या होत्या.  

Also Read : करण सिंग ग्रोव्हरच्या पूर्वपत्नीने त्याच्याच मित्रासोबत केला आहे विवाह

Web Title: The small screen currently being played with Aishwarya Rai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.