सीताला झाली दुखापत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2016 13:33 IST2016-05-29T08:03:44+5:302016-05-29T13:33:44+5:30
मालिका असो या चित्रपट यांच्या शुटिंगच्या दरम्यान अपघात हे होतच असतात. पण त्या त्या चित्रपटातील व मालिकेतील कलाकार आपल्या ...
सीताला झाली दुखापत
म लिका असो या चित्रपट यांच्या शुटिंगच्या दरम्यान अपघात हे होतच असतात. पण त्या त्या चित्रपटातील व मालिकेतील कलाकार आपल्या कामाला प्राधान्य देऊन दुखापत झाली असताना देखील, पुन्हा कामास तयार होतात. असाच एक अपघात सिया के राम या मालिकेच्या शुटिंगदरम्यान झाला. या मालिकेचे नुकतेच सीतेचे दृश्य चित्रित करण्यात आले. यात रावणाला पाहून सीता पळते असे एक दृश्य होते.पण हे दृश्य चित्रित करताना सीतेची भूमिका साकारणारी अभिनेत्री मदीराक्षसी मुंदळे हिला चांगलीच दुखापत झाली. यानंतर तिने एकच दिवस आराम केला. आणि पुन्हा चित्रिकरणाला सुरूवात केली. सध्या ती पेन किलनर घेऊन चित्रिकरण करत आहे.