श्वेता तिवारी नव्हे मेघा गुप्ता दिसणार 'या' मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2017 17:49 IST2017-05-25T12:19:10+5:302017-05-25T17:49:10+5:30

'इंतकाम एक मासूम का' या मालिकेतून श्वेता तिवारी थोड्या पडद्यावर कमबॅक करणार असल्याची चर्चा होती. श्वेताने काही महिन्यांपूर्वीच एक ...

Shweta Tiwari and Megha Gupta will be seen in the series' | श्वेता तिवारी नव्हे मेघा गुप्ता दिसणार 'या' मालिकेत

श्वेता तिवारी नव्हे मेघा गुप्ता दिसणार 'या' मालिकेत

'
;इंतकाम एक मासूम का' या मालिकेतून श्वेता तिवारी थोड्या पडद्यावर कमबॅक करणार असल्याची चर्चा होती. श्वेताने काही महिन्यांपूर्वीच एक गोंडस बाळाला जन्म दिला आहे. आई झाल्यानंतर श्वेता इंतकाम एक मासूम का’ या आगामी मालिकेतून छोट्या पडद्यावर एंट्री करणार होती. मात्र काहीतरी बिनसले आणि श्वेताची जागा या मालिकेत मेघा गुप्ताने घेतली. श्वेताच्या ठिकाणी मालिकेतजान्हवीची भूमिका मेघा साकारणार आहे. त्यामुळे आता अविनाश सचदेवाच्या प्रेयसीच्या भूमिकेत मेघा गुप्ता असेल.
मेघा गुप्ताकडे याविषयी विचारणा केली असता ती म्हणाली, “हो, मी या मालिकेत जान्हवीची भूमिका साकारणार आहे. यासंदर्भात पहिल्यापासूनच सर्व काही अनुकूल घडत गेलं. जेव्हा मालिकेच्या निर्मात्या माझ्याकडे आल्या, तेव्हापासूनच मला त्यांना नक्की काय हवंय, हे अचूक समजलं होतं. मलाही काहीतरी नवं, वेगळं करायचं होतं, म्हणून मी त्या भूमिकेला तात्काळ होकार दिला. या निर्णयाबद्दल दु:ख वाटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही कारण मला त्यातील सारं काही आवडलं आहे- चित्रीकरण, व्यक्तिरेखा, पुन्हा कॅमेऱ्यासमोर उभं राहणं- सर्वकाही!”

‘इंतकाम एक मासूम का’ ही एका आठ वर्षांच्या मुलाची सूडकथा असून तो आपल्यावरील अन्यायाचा बदला घेत असतो. रिकी पटेल हा या मालिकेत मध्यवर्ती भूमिका साकारीत आहे.
मेघाने या आधी सीआईडी, कुमकुम, ममता आणि  मैं तेरी परछाईं या मालिकेत  महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. लग्नानंतर काही महिने मेघनाने ब्रेक घेतला होता. लग्नानंतर इंतकाम एक मासूम का ही मेघाची पहिलीच मालिका असणार आहे. त्यामुळे मेघाचे फॅन्स तिला टीव्हीवर बघण्यास नक्कीच उत्सुक असतील.

Web Title: Shweta Tiwari and Megha Gupta will be seen in the series'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.