​श्वेता तिवारी आणि अभिनव कोहली यांच्यात आला दुरावा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2017 11:29 IST2017-10-14T05:59:11+5:302017-10-14T11:29:11+5:30

श्वेता तिवारी आणि अभिनव कोहली यांच्यात सगळे काही आलबेल सुरू नसल्याचे म्हटले जात आहेत. दोघांच्या करियरमुळे त्यांच्याच भांडणे होत ...

Shweta Tiwari and Abhinav Kohli got scared? | ​श्वेता तिवारी आणि अभिनव कोहली यांच्यात आला दुरावा?

​श्वेता तिवारी आणि अभिनव कोहली यांच्यात आला दुरावा?

वेता तिवारी आणि अभिनव कोहली यांच्यात सगळे काही आलबेल सुरू नसल्याचे म्हटले जात आहेत. दोघांच्या करियरमुळे त्यांच्याच भांडणे होत असल्याची चर्चा आहे. श्वेता तिवारीचे पहिले लग्न राजा चौधरीसोबत झाले होते. श्वेताने छोट्या पडद्यावर पदार्पण केले तेव्हाच तिचे आणि राजाचे लग्न झाले होते. राजा आणि श्वेता नच बलिये या कार्यक्रमात देखील झळकले होते. पण राजाच्या विचित्र वागण्यामुळे श्वेताने त्याला घटस्फोट दिला. राजा आणि श्वेताला पलक ही मुलगी असून या मुलीचा सांभाळ श्वेताच करत होती. श्वेताने चार वर्षांपूर्वी अभिनव कोहलीसोबत लग्न केले. श्वेता आणि अभिनवची ओळख जाने क्या बात हुई या मालिकेच्या दरम्यान झाली होती. या भेटीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. जुलै २०१३ ला ते दोघे विवाहबंधनात अडकले. त्या दोघांना ११ महिन्याचा मुलगा देखील आहे. पण सध्या त्यांच्यात दुरावा निर्माण झाला असल्याचे म्हटले जात आहे.
श्वेता ही एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. कसोटी जिंदगी की या मालिकेमुळे ती नावारूपाला आली. त्यानंतर ती झलक दिखला जा, नच बलिये यांसारख्या अनेक रिअॅलिटी शोमध्ये झळकली. बिग बॉस या कार्यक्रमाचे तिने विजेतेपद देखील मिळवले होते. ती एक यशस्वी अभिनेत्री असली तरी अभिनवला तिच्या इतके यश मिळवता आले नाही. याच कारणामुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला असल्याचे म्हटले जात आहे. पण या सगळ्या केवळ अफवा असल्याचे अभिनवने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले आहे. श्वेता आणि त्याच्या नात्याविषयी अभिनव सांगतो, माझ्यात आणि श्वेतामध्ये कोणत्याही बाबतीत वाद नाहीये. आमचे आयुष्य सुरळीतपणे सुरू आहे. तिच्या करियरमुळे कधीच माझ्या मनात असुरक्षिततेची भावना नव्हती आणि आता देखील नाहीये. सध्या आम्ही दोघेही आमच्या करियरवर लक्ष केंद्रित करत आहोत. आम्ही दोघे एकमेकांसोबत खूपच खूश आहोत. त्यामुळे अशाप्रकारच्या अफवा कोणीही पसरवू नयेत. 

Also Read : ​पलक तिवारी नंतर श्वेता तिवारीची 'ही' ऑनस्क्रिन मुलगी बॉलिवूडच्या वाटेवर?

Web Title: Shweta Tiwari and Abhinav Kohli got scared?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.