श्रुती सेठची अचानक करण्यात आली सर्जरी, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 05:53 PM2020-12-30T17:53:50+5:302020-12-30T17:54:43+5:30

श्रुतीने शेअर केलेल्या फोटोत ती रुग्णालयाच्या बेडवर झोपलेली दिसत आहे.

Shruti Seth of Shararat fame undergoes emergency surgery | श्रुती सेठची अचानक करण्यात आली सर्जरी, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती

श्रुती सेठची अचानक करण्यात आली सर्जरी, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती

googlenewsNext
ठळक मुद्देश्रुतीची सोशल मीडियावरील ही पोस्ट पाहून तिच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. श्रुतीच्या तब्येतीला काय झाले याची चिंता त्यांना लागली आहे.

अभिनेत्री श्रुती सेठने छोट्या पडद्याप्रमाणेच मोठ्या पडद्यावर देखील खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. शरारत या मालिकेत तिने साकारलेल्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. फना या चित्रपटात ती काजोलच्या मैत्रिणीच्या भूमिकेत दिसली होती. श्रुतीवर तातडीने एक सर्जरी करण्यात आली असून तिनेच सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांना ही गोष्ट सांगितली आहे. एवढेच नव्हे तर आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका असे देखील तिने तिच्या चाहत्यांना सांगितले आहे. 

श्रुतीने शेअर केलेल्या फोटोत ती रुग्णालयाच्या बेडवर झोपलेली दिसत आहे. तिने या फोटोसोबत लिहिले आहे की, सगळे काही योग्य वेळेत झाले यासाठी मी खूप खूश आहे. ख्रिसमस आणि नववर्षासाठी मी काही प्लान केले होते. हे प्लान मला या सर्जरीमुळे रद्द करावे लागले. पण या सगळ्यातून केवळ मी एक गोष्ट शिकले आहे की, आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका... 

श्रुतीची सोशल मीडियावरील ही पोस्ट पाहून तिच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. श्रुतीच्या तब्येतीला काय झाले याची चिंता त्यांना लागली आहे. श्रुती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी  तिचे चाहते प्रार्थना करत असल्याचे ते कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत.

श्रुती सेठने काही वर्षांपूर्वी छोट्या पडद्यावर खूप चांगल्या भूमिका साकारल्या होत्या. शरारत या मालिकेत तिने साकारलेली जिया ही भूमिका आजदेखील प्रेक्षकांच्या लक्षात आहे. छोट्या आणि मोठ्या पडद्याप्रमाणेच तिने वेबसिरिजमध्ये देखील काम केले आहे. ती नुकतेच मेंटलहूड आणि द फॉरगटन आर्मी या वेबसिरीजमध्ये झळकली होती. द फॉरगटन आर्मी या वेबसिरिजची चांगलीच चर्चा झाली होती. या वेबसिरिजमध्ये तिने साकारलेल्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. 

श्रुती सेठचे लग्न झाले असून तिला एक मुलगी देखील आहे. तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर आपल्याला अनेकवेळा तिच्यासोबत तिच्या मुलीचे फोटो पाहायला मिळतात.

Web Title: Shruti Seth of Shararat fame undergoes emergency surgery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.