"केसाला धक्का, कपाळाला बुक्का", 'पुष्पा'च्या आवाजात श्रेयस तळपदे बोलला शिवाचा डायलॉग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 17:46 IST2025-03-06T17:45:22+5:302025-03-06T17:46:24+5:30

Shreyas Talpade : झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यादरम्यानचा अभिनेता श्रेयस तळपदेसोबत आलेला अनुभव पूर्वा कौशिक हिने सांगितला आहे.

Shreyas Talpade spoke Shiva's dialogue in Pushpa's voice | "केसाला धक्का, कपाळाला बुक्का", 'पुष्पा'च्या आवाजात श्रेयस तळपदे बोलला शिवाचा डायलॉग

"केसाला धक्का, कपाळाला बुक्का", 'पुष्पा'च्या आवाजात श्रेयस तळपदे बोलला शिवाचा डायलॉग


'शिवा' मालिकेने (Shiva Serial) कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील शिवा आणि आशूची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. "केसाला धक्का, कपाळाला बुक्का" हा शिवाचा मालिकेतील लोकप्रिय डायलॉग आहे. नुकतेच झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यादरम्यान अभिनेता श्रेयस तळपदेने पुष्पाच्या अंदाजात शिवाचा डायलॉग म्हणून दाखवला.

झी चित्र गौरव पुरस्काराचं यंदाचं २५ वं वर्ष आहे. तेव्हा यावर्षी प्रेक्षकांसाठी या पुरस्कार सोहोळ्यात अनेक सरप्राइजिंग एलिमेंट्स  असणार आहेत. याच पुरस्कार सोहळ्यातील एका खास परफॉर्मेंसचा किस्सा आपल्या शिवाने म्हणजेच पूर्वा कौशिकने सांगितला. "झी चित्र गौरव पुरस्कार आपलं २५ वं वर्ष साजरं करत आहे. मला त्यात सहभागी होण्याची संधी मिळाली खूप भारी वाटलं. या सोहळ्यात शिवा म्हणून मला डांस करण्याची संधी मिळाली आणि ते ही श्रेयस तळपदे यांच्या सोबत. मी लहान असताना त्यांचा इकबाल सिनेमा पहिला होता आणि त्यासोबत बरेच सिनेमे आणि मालिकाही पहिल्या आहेत. माझ्यासाठी तो मोठा सेलेब्रिटी आहे उत्तम  कलाकार आहे. आम्ही २ वेळा टेक्निकल केली आणि मग वन टेक परफॉर्म केलं."


एक किस्सा मला सांगायला आवडेल हे तर सर्वाना माहिती आहे की श्रेयसने पुष्पा फिल्मच्या हिंदी व्हर्जन मध्ये आपला आवाज दिला आहे,  जेव्हा मी बॅक स्टेज श्रेयसला भेटले तेव्हा मी त्याला शिवा म्हणून एक विनंती केली की शिवाचा एक डायलॉग बोलशील का "केसाला धक्का, कपाळाला बुक्का" आणि त्यांनी पुष्पांच्या आवाजात तो डायलॉग म्हणून दाखवला. जे मला इतकं भारी वाटलं, असे पूर्वा कौशिक म्हणाली.
 

Web Title: Shreyas Talpade spoke Shiva's dialogue in Pushpa's voice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.