करिश्मा ऐवजी श्रद्धा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2016 13:09 IST2016-08-17T07:39:34+5:302016-08-17T13:09:34+5:30

मझाक मझाक में या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करिश्मा कोटक करत होती. पण या कार्यक्रमात तिचा तितकासा प्रभाव पडत नाही असे ...

Shraddha instead of charisma | करिश्मा ऐवजी श्रद्धा

करिश्मा ऐवजी श्रद्धा

n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small; line-height: normal;">मझाक मझाक में या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करिश्मा कोटक करत होती. पण या कार्यक्रमात तिचा तितकासा प्रभाव पडत नाही असे वाटत असल्याने दुसऱ्या कलाकारांचा शोध कित्येक दिवसांपासून सुरू होता. प्रोडक्शन हाऊसकडून श्रद्धा आर्य आणि आरुषी विराणी या दोघांचा सूत्रसंचालनासाठी विचार केला जात होता. यात श्रद्धाने बाजी मारली असून श्रद्धा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे. पण मला कार्यक्रमातून काढले नसून मी स्वतः कार्यक्रम सोडला असल्याचे करिश्माचे म्हणणे आहे. ती सांगते, "मझाक मझाक या कार्यक्रमाचे चित्रीकरण जूनमध्ये संपणार होते. पण आता हे चित्रीकरण लांबले असून सप्टेंबरमध्ये संपण्याची शक्यता आहे. मला एका प्रोजेक्टसाठी लंडनला जायचे असल्याने मी हा कार्यक्रम सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मी हा प्रोजेक्ट करणार असल्याचे अनेक महिन्यांपूर्वीच ठरले होते. तारखा जुळत नसल्यानेच मी हा कार्यक्रम सोडण्याचा निर्णय घेतला आहे."

Web Title: Shraddha instead of charisma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.