'सुंदरा मनामध्ये भरली'मध्ये धक्कादायक वळण!, अभ्याची होणार एक्झिट?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 01:35 PM2022-09-19T13:35:38+5:302022-09-19T13:36:01+5:30

'सुंदरा मनामध्ये भरली'(Sundara Manamadhye Bharali) मालिकेत मोठा लीप घेण्यात येणार आहे.

Shocking twist in 'Sundara Manamadhye Bharali'!, Abhaya's exit? | 'सुंदरा मनामध्ये भरली'मध्ये धक्कादायक वळण!, अभ्याची होणार एक्झिट?

'सुंदरा मनामध्ये भरली'मध्ये धक्कादायक वळण!, अभ्याची होणार एक्झिट?

googlenewsNext

कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'सुंदरा मनामध्ये भरली'(Sundara Manamadhye Bharali)नं कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील लतिका आणि अभिमन्यू यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते आहे. दरम्यान आता मालिकेत धक्कादायक वळण येणार आहे. आता मालिकेत मोठा लीप घेण्यात येणार आहे. मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे. त्यामध्ये मालिकेचं  कथानक पाच ते सहा वर्ष पुढे जाणार असल्याचे दिसते आहे. त्यातून समजते आहे की, अभ्याचा मृत्यू होणार आहे आणि त्याची मालिकेतून एक्झिट होण्याची शक्यता आहे.

सुंदरा मनामध्ये भरली मालिकेचा नवीन प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये मालिकेचे  कथानक बरेच वर्ष पुढे सरकले आहे. प्रोमोत अभ्या आणि लतिकाची  छोटी मुलगी दाखवली आहे. ती लातिकासारखीच गुटगुटीत आहे. पण तिने लतिकाला विचारलेल्या एका प्रश्नामुळे मालिकेत अभ्या असणार की नाही याबद्दल प्रेक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्या मुलीला सगळे 'ढोली' म्हणून चिडवताना दिसतात. तेव्हा ती चिडून लतिकाला म्हणते, ''तू देव बाप्पाला सांग की माझ्या बाबाला खाली पाठवून दे.'' हे ऐकून लतिका भावुक होताना दिसते.

हा प्रोमो पाहून अभ्याने या मालिकेतून एक्झिट घेतल्याची शक्यता आहे. आता सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत लतिका आणि तिच्या मुलीचा प्रवास दाखवला जाणार आहे. पण लतिका आणि अभ्याची जोडी मात्र आता प्रेक्षकांना पाहायला मिळणार नाही. लतिकाचे  आयुष्य आता पूर्णपणे बदलणार आहे. ती मुलीला कशी वाढवते, सगळ्या संकटाना कशी मात देते हे मालिकेत पाहायला मिळणार आहे.

Web Title: Shocking twist in 'Sundara Manamadhye Bharali'!, Abhaya's exit?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.