धक्कादायक वळण 'आई कुठे काय करते'मध्ये, अभि-अनघाच्या साखरपुड्यात अंकिताचे विघ्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 13:57 IST2021-05-10T13:56:02+5:302021-05-10T13:57:06+5:30
'आई कुठे काय करते' मालिकेत नवा ट्विस्ट येणार आहे.

धक्कादायक वळण 'आई कुठे काय करते'मध्ये, अभि-अनघाच्या साखरपुड्यात अंकिताचे विघ्न
अल्पावधीतच छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते'ने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. सध्या मालिकेत अभिच्या साखरपुड्याची रेलचेल असताना मालिकेत नवा ट्विस्ट येणार आहे. आधी देशमुखांच्या घरात न बोलवता संजना आल्यानंतर आता अंकिताचे येऊन धडकली आहे. त्यामुळे आता अभि आणि अनघाचा साखरपुडा होणार की नाही, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
आई कुठे काय करते मालिकेत देशमुख कुटुंब मुंबई सोडून गावातल्या घरी राहायला आले आहेत. अनेक अडचणींनंतर अरुंधती आणि अनिरुद्धचा मोठा मुलगा डॉ. अभिषेकचा साखरपुडा अनघाशी होणार आहे. या साखरपुड्यासाठी अनघा व तिचे वडील गावी पोहचले आहेत. त्यात संजना अचानक गावी येऊन धडकल्यामुळे घरात छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होताना पहायला मिळत आहे. त्यानंतर आता समजतंय की अंकिता देखील साखरपुड्याच्या दिवशी तिथे येणार आहे. त्यामुळे आता नेमके मालिकेत काय घडणार, हे पाहावे लागेल.
दरम्यान आता आई कुठे काय करते मालिकेतील अभि-अनघाच्या साखरपुड्याचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. यामध्ये एका फोटोत अंकिताच्या गळ्यात मंगळसूत्र दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये संजना अंकिताचे औक्षण करताना दिसते, तर एका फोटोत अरुंधती अभिषेकचा गळा धरताना दिसते. हे फोटो मालिकेचा भाग आहेत, की सेटवरील टाईमपास, हे स्पष्ट झालेले नाही. मात्र मालिकेचा नवा प्रोमो नक्कीच उत्कंठा वाढवणारा आहे.
अभि-अनघाच्या साखरपुड्यावेळी अरुंधती संजनाला जाब विचारते की, अंकिताला अभिच्या साखरपुड्याविषयी तू सांगितलेस का. त्यावर “मी तिला हेच सांगितलं की अनिरुद्धने खूप प्रयत्न केला तुझा आणि अभिचे लग्न व्हावे म्हणून, पण अरुंधती…” असे संजना सांगत असतानाच अरुंधती तिच्या कानाशीलात लगावते. त्यानंतर चिडलेली अरुंधती “संजना, तू माझ्या संसारात ढवळाढवळ केलीस, पण माझ्या मुलांच्या वाट्याला जायचे नाही” असे खडसावते.