धक्कादायक! बिग बॉसच्या घरात ही स्पर्धक राहिली होती प्रेग्नेंट,म्हणून झाली शोमधून एक्झिट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2017 17:06 IST2017-10-26T11:36:22+5:302017-10-26T17:06:22+5:30

छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शो बिग बॉस पहिल्या सीझनपासून या ना त्या कारणामुळं वादाच्या भोव-यात सापडला. स्पर्धकांचं वागणं, शोमधील अश्लीलता ...

Shocking The participant in Big Boss's house was pregnant, so was the exit from the show! | धक्कादायक! बिग बॉसच्या घरात ही स्पर्धक राहिली होती प्रेग्नेंट,म्हणून झाली शोमधून एक्झिट!

धक्कादायक! बिग बॉसच्या घरात ही स्पर्धक राहिली होती प्रेग्नेंट,म्हणून झाली शोमधून एक्झिट!

ट्या पडद्यावरील रिअॅलिटी शो बिग बॉस पहिल्या सीझनपासून या ना त्या कारणामुळं वादाच्या भोव-यात सापडला. स्पर्धकांचं वागणं, शोमधील अश्लीलता यावरुन या शोची कायमच चर्चा झाली. या शोमध्ये अफेअर होणं, किसिंग सीन आणि स्क्रीपटेड लग्नसोहळा रचणं हे बिग बॉसमध्ये रसिकांनी पाहिलं होतं. या सगळ्याच गोष्टीचा साक्षीदार बिग बॉसचं घर बनल्याचे पाहायला मिळाले. मात्र बिग बॉसच्या घरात अशी एक गोष्ट घडली आहे जी वाचून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.जे आजवर कधीही समोर आलं नाही असं बिग बॉसच्या घरातलं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. ही गोष्ट जाणून घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या मेमरीला रिवाईंड करावं लागेल आणि जावं लागेल बिग बॉसच्या सीझन ४मध्ये. चौथ्या सीझनमध्ये बिग बॉसच्या घरात एक स्पर्धक होती जिचं नाव होतं साक्षी प्रधान.बिग बॉसच्या या सीझन दरम्यान साक्षीला गरज पडेल तेव्हा डॉक्टरांना कन्सल्ट करण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे ती प्रेग्नेंट असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात सुरु झाल्या. इतकंच नाहीतर बिग बॉसच्या घरातील इतर स्पर्धक असलेल्या श्वेता तिवारी, वीणा मलिक आणि सारा खान यांना तिनं मासिक पाळी चुकल्याचंही सांगितलं होतं.मासिक पाळी न आल्याने अनवॉन्टेड प्रेग्नन्सीची भीती साक्षीला सतावत होती.अखेर साक्षी प्रेग्नेंट असल्याने तिला बिग बॉसच्या घरातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. मात्र बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर तिने या सगळ्याचा इन्कार केला. आपण फक्त २१ वर्षीय असून सध्या फक्त करियरवरच लक्ष केंद्रीत करायचं मी प्रेग्नेंट कशी असू शकते असं सांगत वेळ मारुन नेण्याचा तिने प्रयत्न केला. खरं काय ते आता साक्षीलाच माहिती. बिग बॉसमध्ये येण्याआधी साक्षी स्प्लिट्सविला या डेटिंग शोच्या दुस-या पर्वाची विजेती आहे. इतकंच नाही तर तिचा एक एमएमएससुद्धा लीक झाला होता.यांत एका तरुणासह ती इंटिमेट होताना दिसली होती. बिग बॉसमध्ये ती अश्मित पटेलला पॉप्स या नावाने हाक मारत असे. मात्र प्रेग्नेन्सीबाबत खरं काय खोटं काय हे साक्षी आणि बिग बॉसचे निर्मातेच सांगू शकतात. 

Web Title: Shocking The participant in Big Boss's house was pregnant, so was the exit from the show!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.