Shocking! गेल्या ६ वर्षांपासून फक्त एका किडनीवर जिवंत आहे ही अभिनेत्री, आता हवीय तिला आर्थिक मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 03:48 PM2021-07-12T15:48:42+5:302021-07-12T15:49:18+5:30

सध्या ही अभिनेत्री रुग्णालयात दाखल आहे.

Shocking! The actress has been living on only one kidney for the last 6 years, now she needs financial help | Shocking! गेल्या ६ वर्षांपासून फक्त एका किडनीवर जिवंत आहे ही अभिनेत्री, आता हवीय तिला आर्थिक मदत

Shocking! गेल्या ६ वर्षांपासून फक्त एका किडनीवर जिवंत आहे ही अभिनेत्री, आता हवीय तिला आर्थिक मदत

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अनन्या सोनी सध्या रुग्णालयात दाखल आहे. तिच्या उपचारासाठी पुरेसे पैसे नसल्यामुळे तिने आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे. अनन्या सोनीने नामकरण मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारली होती.

अनन्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि तिच्या तब्येतीबद्दल सांगितले आहे. या व्हिडीओत अनन्याने ती गेल्या सहा वर्षांपासून फक्त एका किडनीवर आयुष्य जगत असल्याचे सांगितले आहे. करोनाची लागण झाल्यानंतर अनन्याची प्रकृती खालावली आणि ती रुग्णालयात दाखल झाली. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार अनन्याची किडनी फक्त २ टक्केच काम करते आहे. तसेच उपचारांसाठी अनन्याला पैशाची गरज आहे. आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे तिला उपचार घेणे अशक्य असल्याचे तिने व्हिडीओत सांगितले आहे.


अनन्याने सांगितले की, जेव्हा मी ‘नामकरण’ आणि ‘क्राइम पेट्रोल’ सारख्या मालिकेत काम करत होते. तेव्हा स्वप्नातही विचार केला नव्हता की अशी परिस्थिती येईल. माझ्या आईचा कपड्यांचा बिझनेस होता. माझा भाऊ सगळे नीट सांभाळत होता. मात्र काही दिवसांपूर्वी माझ्या घरात आग लागल्यामुळे कपडे आणि मशिन सर्व काही जळून खाक झाले. सर्व संपले. सर्व सेव्हिंग संपल्या असून काय करावे हे सुचत नसल्याचे तिने सांगितले.


अनन्याने नामकरण आणि क्राइम पेट्रोलसोबतच अदालत, इश्क में मरजावां या मालिकेतदेखील काम केले आहे. याशिवाय टेक इट इजी’ आणि ‘है अपना दिल तो आवारा’ या चित्रपटातही तिने काम केले आहे.

Web Title: Shocking! The actress has been living on only one kidney for the last 6 years, now she needs financial help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.