शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णीच्या लग्नाला २ वर्ष पूर्ण, अभिनेत्रीची पतीसाठी खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 13:06 IST2024-05-03T13:04:24+5:302024-05-03T13:06:26+5:30
मराठी सिनेइंडस्ट्रीतील क्यूट कपल म्हणजे शिवानी रांगोळे (shivani rangole) आणि विराजस कुलकर्णी (virajas kulkarni) . कित्येक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर शिवानी आणि विराजस यांनी ३ मे, २०२२ रोजी लग्न केले.

शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णीच्या लग्नाला २ वर्ष पूर्ण, अभिनेत्रीची पतीसाठी खास पोस्ट
मराठी सिनेइंडस्ट्रीतील क्यूट कपल म्हणजे शिवानी रांगोळे (shivani rangole) आणि विराजस कुलकर्णी (virajas kulkarni) . कित्येक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर शिवानी आणि विराजस यांनी ३ मे, २०२२ रोजी लग्न केले. आज त्यांच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस असून त्यानिमित्ताने शिवानीने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.
शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णी यांच्या लग्नाचा आज वाढदिवस असून त्यानिमित्ताने अभिनेत्रीने खास पोस्ट शेअर केली आहे. तिने त्यांचे फोटो शेअर करत लिहिले की, हॅप्पी अॅनिव्हर्सरी विऱ्या!! असे एकमेकांना वेड लावत, एकत्र वेडे होऊयात. तिच्या या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळत आहे. चाहते त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.
विराजस कुलकर्णी दिग्दर्शित 'डावीकडून चौथी बिल्डिंग' या नाटकात शिवानी रांगोळेने अभिनय केला होता. तिथेच दोघांची ओळख झाली होती. लग्नापूर्वी दोघे १० वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते.
वर्कफ्रंट
वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर विराजस हा अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे. 'माझा होशील ना' या मालिकेतून तो घराघरांत पोहोचला. तो अभिनेत्यासोबत एक लेखक आणि दिग्दर्शकही आहे. 'थेटर ऑन एंटरटेन्मेंट' ही विराजसची निर्मिती संस्था असून त्याने अनेक नाटकांची निर्मिती केली आहे. 'अनाथेमा' या नाटकात त्याने अभिनयाबरोबर दिग्दर्शनाचीही धुरा सांभाळली होती. तसेच 'रमा माधव' चित्रपटासाठी त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. तर दुसरीकडे शिवानीदेखील मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती 'बन मस्का', 'सांग तू आहेस ना', डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरव गाथाया मालिकांमध्ये झळकली आहे. सध्या ती 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेत काम करते आहे.