शिवम वानखेडेने त्याची ड्रीम गर्ल अमृता खानविलकरसह केला धमाकेदार डान्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2017 18:56 IST2017-11-16T13:26:46+5:302017-11-16T18:56:46+5:30
आधीच्या पेक्षा जास्त चांगला, मोठा आणि ग्रँडर असलेला झी टिव्हीच्या डान्स रिअॅलिटी शो डान्स इंडिया डान्सचा ग्रँड प्रिमियर एका ...
शिवम वानखेडेने त्याची ड्रीम गर्ल अमृता खानविलकरसह केला धमाकेदार डान्स
आ ीच्या पेक्षा जास्त चांगला, मोठा आणि ग्रँडर असलेला झी टिव्हीच्या डान्स रिअॅलिटी शो डान्स इंडिया डान्सचा ग्रँड प्रिमियर एका धमाक्याने सुरू होणार आहे शनिवारी 18 नोव्हेंबर रोजी. खडतर ऑडिशनचे महिने संपल्या नंतर, अंतिम डान्स मंचाला त्याचे अविस्मरणीय 18 स्पर्धक मिळाले आहेत, जे येत्या आठवड्यात त्यांच्या ब्लॉकबस्टर डान्स मधून संपूर्ण देशाच्या समोर पदार्पण करणार आहेत. अकुशल डान्सर मधून मार्गदर्शन करून इंडियाचे डान्सिंग सुपरस्टार मध्ये त्यांचे रुपांतर करणार आहेत टॅलेंटेड मास्टर मिनी प्रधान, मर्जी पेस्तनजी आणि मुदस्सर खान. सर्व स्पर्धकांना पहिला अचूक प्रभाव टाकण्याची ही एक सोनेरी संधी आहे, त्यावेळी मुदस्सर की मंडली मधील मराठी मुलगा शिवम वानखेडेने त्याची पहिली कामगिरी त्याच्या ड्रीम गर्लला-डान्स इंडिया डान्स सीझन 6ची होस्ट अमृता खानविलकरला समर्पित केली आहे.
पार्शवभूमीवर अमृताचा मोठा फोटो चिकटवून हवा हवा च्या तालावर डान्स करून शिवम ग्रँड मास्टर मिथुन दा आणि मास्टर्स मिनी प्रधान, मर्जी पेस्तनजी आणि मुदस्सर यांना प्रभावित करण्यात यशस्वी तर झालाच शिवाय त्याच्या विशेष समर्पणामुळे अमृताला सुद्धा त्याच्या सोबत डान्स साठी झपाटून टाकले. त्याच्या असाधारण कामगिरीने थक्क झालेली अमृता मागे राहू शकली नाही आणि ती त्याच्या डान्स मध्ये सामील झाली. त्याच्या गोड अभिनयाने भारावून गेलेली अमृता म्हणाली, “शिवम वानखेडे तू मला लवकर का भेटला नाहीस! तू माझ्या साठी आज जे केलेस ते माझ्या मनाला भिडले आहे. तुझ्या कामगिरीने मी सातव्या आसमानात जाऊन पोहोचले आहे कारण माझ्या संपूर्ण जीवनात माझ्यासाठी असे कोणी केले नाही. अगदी माझ्या पती हिमांशुने सुद्धा आणि मी हे माझ्या हृद्याच्या तळापासून सांगत आहे. मला अशी सुंदर आठवण दिल्या बद्दल मी तुझी आभारी आहे आणि मी ती जीवनभर सांभाळून ठेवीन.”तिची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, अमृताने शिवमचा दिवस विशेष बनविण्याचा निर्णय घेतला आणि सैराट झालं जी या सैराट सिनेमातील रोमँटिक गाण्यावर त्याच्या सोबत डान्स केला.