​एक दिवाना था या मालिकेत शिल्पा तुळसकर दिसणार एका वेगळ्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2017 10:09 IST2017-11-21T04:39:22+5:302017-11-21T10:09:22+5:30

शिल्पा तुळसकरने अनेक मराठी, हिंदी मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. संजीवनी या मालिकेतील शिल्पाच्या भूमिकेचे तर चांगलेच कौतुक ...

Shilpa Tulasar was seen in a different role in this film | ​एक दिवाना था या मालिकेत शिल्पा तुळसकर दिसणार एका वेगळ्या भूमिकेत

​एक दिवाना था या मालिकेत शिल्पा तुळसकर दिसणार एका वेगळ्या भूमिकेत

ल्पा तुळसकरने अनेक मराठी, हिंदी मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. संजीवनी या मालिकेतील शिल्पाच्या भूमिकेचे तर चांगलेच कौतुक झाले होते. शिल्पाने अनेक मराठी चित्रपटांमध्ये देखील दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. आता शिल्पा प्रेक्षकांना एका मालिकेत एका वेगळ्याच भूमिकेत पाहायला मिळणार आहे. शिल्पा तुळसकर आता रोमँटिक थ्रिलर शो एक दिवाना था या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेतील तिची भूमिका आजवर तिने साकारलेल्या भूमिकांपेक्षा हटके असणार आहे. या मालिकेत ती एका साध्वीच्या प्रमुख भूमिकेत दिसणार असून या मालिकेच्या कथानकाला आता चांगलेच वळण मिळणार आहे. शिल्पाला एक वेगळी भूमिका साकारायला मिळत असल्याने ती सध्या चांगलीच खूश आहे. तिच्या या नव्या भूमिकेविषयी ती सांगते, "मी प्रतिक शर्मासोबत अगोदर काम केलेले आहे आणि आज ते टीव्ही उद्योगातील सर्वात विलक्षण कथाकार आहेत. मला नेहमीच प्रतिकच्या पहिल्या प्रकल्पाचा एक भाग व्हायचे होते आणि मला खूप आनंद होत आहे की मला ती संधी मिळाली आहे आणि मी एक दिवाना था या मालिकेमध्ये साध्वीची भूमिका साकारणार आहे. अशा प्रकारची भूमिका करण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे आणि शोचे गूढ घटक वाढविण्यासाठी संपूर्ण देखावा एका अनोख्या पद्धतीने डिझाइन केला गेला आहे. मी या मालिकेसाठी शूटिंग सुरू केले आहे आणि मी माझ्या या नवीन अवताराबद्द्ल प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे."
एक दिवाना था या मालिकेच्या पुढील भागांमध्ये शारन्या आपल्या आजूबाजूच्या अनोख्या घटनांचे कारण समजून घेण्यासाठी आपल्या भूतकाळातील गुपिते शोधण्याचा प्रयत्न करणार आहे. व्योमबरोबर झालेल्या भांडणानंतर शारन्याने शहरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला असून ती एका साध्वीला भेटायला गेली आहे. या साध्वीला ती तिच्या महाविद्यालयीन दिवसांपासून ओळखते आणि ती साध्वी शारन्याला लवकर लग्न करण्याचा सल्ला देणार आहे. साध्वी शारन्याला कसे ओळखते? ती कोणते रहस्य उलगडेल? शारन्याच्या पुढील कृती साध्वीच्या सल्ल्यानुसार होणार का? हे सगळे प्रेक्षकांना या मालिकेच्या पुढील भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. 

Also Read : ​तुमच्या आवडत्या मराठी सेलिब्रिटींचे फॅमिली फोटो

Web Title: Shilpa Tulasar was seen in a different role in this film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.