​शिल्पा शिंदेचे या अभिनेत्यासोबत होणार होते लग्न... लग्नाच्या पत्रिकाही वाटल्या गेल्या होत्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2017 11:32 IST2017-10-26T06:02:01+5:302017-10-26T11:32:01+5:30

भाभीजी घर पर है या मालिकेतील अंगुरी या व्यक्तिरेखेमुळे शिल्पा शिंदे हे नाव घराघरात पोहोचले. या मालिकेत तिच्या बोलण्याची ...

Shilpa Shinde was going to be married to the actress ... The wedding magazines were also shared ... | ​शिल्पा शिंदेचे या अभिनेत्यासोबत होणार होते लग्न... लग्नाच्या पत्रिकाही वाटल्या गेल्या होत्या...

​शिल्पा शिंदेचे या अभिनेत्यासोबत होणार होते लग्न... लग्नाच्या पत्रिकाही वाटल्या गेल्या होत्या...

भीजी घर पर है या मालिकेतील अंगुरी या व्यक्तिरेखेमुळे शिल्पा शिंदे हे नाव घराघरात पोहोचले. या मालिकेत तिच्या बोलण्याची स्टाईल प्रेक्षकांना प्रचंड आवडत असे. पण या मालिकेचे निर्माते संजय कोहली आणि त्यांच्या पत्नीसोबत शिल्पाचा वाद झाल्यामुळे तिने या मालिकेला रामराम ठोकला. सध्या शिल्पा शिंदे प्रेक्षकांना बिग बॉसच्या घरात पाहायला मिळत आहे. बिग बॉसमध्ये देखील तिच्या नावाची चांगलीच चर्चा आहे. बिग बॉसमध्ये प्रवेश केल्यापासूनच तिची आणि विकास गुप्ता यांची भांडणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 
शिल्पा शिंदे ही नेहमीच कॉन्ट्रोव्हर्सीत राहिली आहे. तुम्हाला माहीत आहे का शिल्पा शिंदेचा एका अभिनेत्यासोबत साखरपुडा झाला होता. ते दोघे लग्न देखील करणार होते. लग्न गोव्यात होणार होते. शिल्पा लग्नात काय घालणार याची तयारी झाली होती. लग्नाच्या पत्रिका वाटून झाल्या होत्या. पण लग्नाच्या काही दिवस आधी त्यांचे लग्न मोडले. ही गोष्ट सात-आठ वर्षांपूर्वी झाली होती. हा अभिनेता रोमित राज असून त्याने हातिम, घर की लक्ष्मी बेटिया, मायका यांसारख्या मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.

shilpa shinde romit raj

एका मुलाखतीत शिल्पाने सांगितले होते की, मी त्याच्या आणि त्याच्या पालकांची खूपच काळजी घेतली. पण त्याच्याकडून मला म्हणावा तितका प्रतिसाद कोणत्याच गोष्टीत मिळत नव्हता. मी त्याच्या इच्छेनुसार प्रत्येक गोष्ट करत होती. मालिका करत असल्यास मी खूपच कमी वेळ चित्रीकरण करू शकेल अशी अट निर्मात्यांना घालत असे. कारण मी जास्तीत जास्त वेळ त्याच्यासोबत घालवण्याचा प्रयत्न करत होती. या अटीमुळे मला येणाऱ्या ऑफर्स देखील कमी झाल्या होत्या. मी त्याच्या कुटुंबियांसोबत देखील खूप वेळ घालवला आहे. पण आता आमच्या ब्रेकअप नंतर त्याच्या घरातले कोणीच माझ्याशी बोलत नाही. खरे तर माझे त्यांच्यासोबत नाते खूप चांगले  होते. त्यामुळे मला ही गोष्ट खूपच विचित्र वाटते. 
रोमित राज आज त्याच्या आय़ुष्यात सेटल असून २०१२ मध्ये टीना राजसोबत त्याने लग्न केले. त्याला दोन मुले देखील आहेत. 

Also Read : शिल्पा शिंदे आणि विकास गुप्ता यांचा 'याराना'!

Web Title: Shilpa Shinde was going to be married to the actress ... The wedding magazines were also shared ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.