शिल्पा शिंदेने तिच्या लग्नाविषयी केला मोठा खुलासा, वाचा सविस्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2018 21:09 IST2018-01-28T15:39:44+5:302018-01-28T21:09:44+5:30

कलर्स या वाहिनीवरील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या ‘बिग बॉस’ या शोच्या सीजन-११ची विजेती असलेली शिल्पा शिंदे शोनंतरही सातत्याने चर्चेत राहत ...

Shilpa Shinde made a great disclosure about her marriage, read detailed! | शिल्पा शिंदेने तिच्या लग्नाविषयी केला मोठा खुलासा, वाचा सविस्तर!

शिल्पा शिंदेने तिच्या लग्नाविषयी केला मोठा खुलासा, वाचा सविस्तर!

र्स या वाहिनीवरील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या ‘बिग बॉस’ या शोच्या सीजन-११ची विजेती असलेली शिल्पा शिंदे शोनंतरही सातत्याने चर्चेत राहत आहे. अर्थातच ही चर्चा तिच्या लग्नावरून आहे. कारण शो जिंकल्यानंतर तिचे चाहते आता तिच्या लग्नाची बातमी ऐकू इच्छितात. छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या अभिनेत्रींपैकी एक शिल्पा शिंदेने चाळीशी पार केली आहे. वास्तविक तिच्या आयुष्यात लग्नाची एक वेळ आली होती. विशेष म्हणजे लग्नाच्या पत्रिकाही वाटल्या गेल्या, परंतु ऐनवेळी असे काही घडले ज्यामुळे तिचे लग्न मोडले. असो आता शिल्पाने तिच्या लग्नाबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. 

स्पॉटबॉय डॉट कॉमशी बोलताना शिल्पा तिच्या लग्नाविषयी सांगितले की, ‘मी असे म्हणत नाही की, आयुष्यात मी कधीच लग्न करणार नाही. खरं तर माझ्या भविष्यात नेमके काय लिहिले आहे हे मला माहिती नाही. त्यामुळे मी हे स्पष्ट करू इच्छिते की, सध्यातरी मी लग्नाविषयी विचार करीत नाही. मला सिंगल राहायला आवडते. कारण मी सध्या स्वतंत्र जीवन जगू इच्छिते.’



पुढे बोलताना शिल्पाने म्हटले की, मला असे वाटते की लग्न खूप मोठी बाब आहे अन् त्याविषयीचा तेवढाच मोठा निर्णयही आहे. त्यामुळे जोडीदाराचे अन् माझे विचार जुळायला हवेत. कारण आमच्या लाइफस्टाइलचा विचार करता ही बाब खरोखरच खूप महत्त्वाची आहे. यावेळी शिल्पाला असेही विचारण्यात आले की, तू एखाद्या पुरुषाची कंपनी मिस करीत नाहीस काय? त्यावर तिने हसतहसत उत्तर देत म्हटले की, ‘अजिबात नाही’!

Web Title: Shilpa Shinde made a great disclosure about her marriage, read detailed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.