'सुपर डान्सर ४'च्या मंचावर साजरा केला शिल्पा शेट्टीचा वाढदिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 05:09 PM2021-06-08T17:09:20+5:302021-06-08T17:09:43+5:30

सुपर डान्सर सीझन ४ च्या आगामी भागात ‘गुरु-शिष्य की अदलाबदली’ ही थीम आहे, त्यामुळे या भागात प्रेक्षक स्पर्धकांना आपल्या ‘नवीन’ गुरु समवेत वेगळी डान्स स्टाइल आजमावताना दिसतील.

Shilpa Shetty's birthday celebrated on the stage of 'Super Dancer 4' | 'सुपर डान्सर ४'च्या मंचावर साजरा केला शिल्पा शेट्टीचा वाढदिवस

'सुपर डान्सर ४'च्या मंचावर साजरा केला शिल्पा शेट्टीचा वाढदिवस

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या छोट्या पडद्यावरील डान्सिंग रिएलिटी शो सुपर डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परिक्षकाच्या भूमिकेत पहायला मिळते आहे. नुकताच शिल्पा शेट्टीने या शोच्या कुटुंबासोबत वाढदिवस साजरा केला. या सेटवरील तिच्या बर्थ डे सेलिब्रेशनचे फोटो नुकतेच समोर आले आहेत. 

सुपर डान्सर सीझन ४ मध्ये या वीकएंडला असणार आहे दिमाखदार सेलिब्रेशन. येत्या भागात ‘गुरु-शिष्य की अदलाबदली’ हे थीम आहे, त्यामुळे या भागात प्रेक्षक स्पर्धकांना आपल्या ‘नवीन’ गुरु समवेत वेगळी डान्स स्टाइल आजमावताना दिसतील. शिवाय, शिल्पा शेट्टी कुंद्राचा वाढदिवस साजरा करण्याचीही पूर्ण तयारी आहे. शूटिंग दरम्यान हे समजल्यानंतर शिल्पाला सुखद आश्चर्याचा धक्काच बसला होता.


शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. बऱ्याचदा ती इंस्टाग्रामवर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. बऱ्याचदा ती तिच्या फिटनेसमुळे चर्चेत येत असते. तसेच सोशल मीडियावर शेअर केलेल्या डान्स व्हिडीओदेखील तिचे व्हायरल होताना दिसतात.


शिल्पा शेट्टीने ‘बाजीगर’ या चित्रपटाद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. पहिल्याच चित्रपटातील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. तिने त्यानंतर एकाहून एक हिट चित्रपट दिले. तिने धडकन, रिश्ते, गर्व, मैं खिलाडी तू अनाडी यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तिने मोठ्या पडद्यानंतर छोट्या पडद्यावर देखील तिचे प्रस्थ निर्माण केले आहे. सुपर डान्सरमधील सुपर से उपर बोलण्याची तिची अदा प्रेक्षकांना प्रचंड आवडते. 


शिल्पा शेट्टीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर लवकरच ती निकम्मा चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात शिल्पा शेट्टीसोबत भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू दासानी आणि गायिका शर्ले सेतिया मुख्य भूमिकेत दिसणार आहे.


याशिवाय शिल्पा शेट्टी, परेश रावल आणि मिजान जाफरीसोबत हंगामा २मध्ये दिसणार आहे. बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर शिल्पा शेट्टी रुपेरी पडद्यावर कमबॅक करते आहे.

Web Title: Shilpa Shetty's birthday celebrated on the stage of 'Super Dancer 4'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.