Sher-E-Punjab Maharaja Ranjit Singh: या कारणामुळे तुनिषा शर्मा आणि दमनप्रीतसिंग या बालकलाकारांची करण्यात झाली निवड
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2017 16:25 IST2017-01-30T10:55:19+5:302017-01-30T16:25:19+5:30
महाराजा रणजितसिंग ही मालिकेची घोषणा केल्यापासून टीव्ही इंडस्ट्रीत नव्या चर्चेला उधाण आले आहे; कारण शीख समाजावर प्रथमच एक मालिका ...
.jpg)
Sher-E-Punjab Maharaja Ranjit Singh: या कारणामुळे तुनिषा शर्मा आणि दमनप्रीतसिंग या बालकलाकारांची करण्यात झाली निवड
म ाराजा रणजितसिंग ही मालिकेची घोषणा केल्यापासून टीव्ही इंडस्ट्रीत नव्या चर्चेला उधाण आले आहे; कारण शीख समाजावर प्रथमच एक मालिका तयार केली जात आहे. आता महाराजा रणजितसिंग आणि त्यांची पत्नी मेहताब यांच्या लहानपणीच्या भूमिका साकारण्यासाठी निर्मात्यांनी दोन बाल कलाकारांची निवड केली आहे. हे बालकलाकार शीख समाजातीलच असून पंजाबमध्ये खूपच लोकप्रिय आहेत.महाराजांच्या भूमिकेसाठी दमनप्रीतसिंग या कलाकाराची निवड करण्यात आली आहे. हा बालकलाकार पंजाबी सिनेसृष्टीत लोकप्रिय असून तो कपिल शर्माच्या आगामी सिनेमातही भूमिका साकारणार आहे.मेहताब कौर यांच्या भूमिकेसाठी तुनिषा शर्मा हिची निवड करण्यात आली आहे. तुनिषाने यापूर्वी ‘कहानी -2’ आणि ‘फितूर’ या सिनेमांमध्येही भूमिका साकारल्या होत्या. ही मालिका महाराजा रणजितसिंग यांच्या जीवनप्रवासावर आधारित आहे. युध्दकाळातही मानवतावादी भूमिका स्वीकारणारे आणि ‘प्रजेवर राज्य करण्याऐवजी प्रजेची सेवा करणारे’ म्हणून महाराजा प्रसिध्द होते.आपल्या निवडीमुळे आनंदी असलेल्या दमनप्रीतने सांगितले, मी पंजाबी आहे, हे माझं सुदैव आहे; कारण मला ही भूमिका साकारण्याची संधी मिळाली हा यामुळे मी भाग्यशाली समजतो,कारण आम्ही सर्वजण राजा रणजितसिंग यांचा खूप आदर करतो. मी लहान असल्यापासून त्यांच्या कथा ऐकत आलो आहे आणि आता मला त्यांचीच व्यक्तिरेखा रंगविण्यास मिळत आहे. माझं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटतं.”