सिद्धार्थच्या जाण्याने कोलमडली शहनाज गिल; वडील म्हणाले, माझी मुलगी....

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2021 05:18 PM2021-09-02T17:18:17+5:302021-09-02T17:20:21+5:30

SidNaaz ची जोडी तुटली...! जेव्हा शहनाजला सिद्धार्थच्या मृत्यूची बातमी मिळाली, तेव्हा ती तिच्या एका शूटिंगमध्ये व्यस्त होती....

shehnaaz gill is not fine after sidharth shukla death says her father | सिद्धार्थच्या जाण्याने कोलमडली शहनाज गिल; वडील म्हणाले, माझी मुलगी....

सिद्धार्थच्या जाण्याने कोलमडली शहनाज गिल; वडील म्हणाले, माझी मुलगी....

googlenewsNext
ठळक मुद्दे‘बिग बॉस 13’मध्ये सिद्धार्थ आणि शहनाज यांचीकेमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती.

‘सिड’ अचानक जगाला अलविदा म्हणत निघून गेला आणि ‘नाज’ एकटी मागे उरली. होय, सिद्धार्थ शुक्लाच्या अकाली निधनानंतर (Sidharth Shukla dies) ‘सिडनाज’ जोडी कायमची दुभंगली. ‘बिग बॉस 13’नंतर सिद्धार्थ शुक्ला व शहनाज गिल (Shehnaaz Gill) यांची जोडी ‘सिडनाज’ ( SidNaaz) नावानं लोकप्रिय झाली होती. पण आज सकाळी सिडच्या निधनाची बातमी आली आणि सगळंच संपलं.  शहनाज त्यावेळी सेटवर शूटींगमध्ये बिझी होती. सिद्धार्थ गेल्याची बातमी मिळाली आणि शूटींग अर्धवट सोडून ती तशीच धावत सुटली.
सिद्धार्थच्या अकाली निधनानं त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. शहनाजची अवस्थाही वेगळी नाही. तिच्या डोळ्यातील अश्रू क्षणभरही थांबलेले नाहीत. सिद्धार्थच्या निधनानं तिला जबर धक्का बसला आहे. माझ्या मुलगी ठीक नाहीये..., असं तिच्या वडिलांनी सांगितलं.

स्पॉटबॉयशी बोलताना शहनाजचे वडील संतोख सिंह म्हणाले, ‘सिद्धार्थच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर माझी मुलगी ठीक नाहीये. तिला सांभाळण्यासाठी तिचा भाऊ शहबाज मुंबईला रवाना झाला आहे. नंतर मी सुद्धा मुंबईला जाणार आहे. मी तिच्याशी बोललो, ती ठीक नाहीये. मला स्वत:ला विश्वास बसत नाहीये. मग शहनाज तर सिद्धार्थच्या इतकी क्लोज होती. तिची अवस्था तुम्ही समजू शकता. मी आता काहीही बोलण्याच्या मन:स्थितीत नाही.’

‘बिग बॉस 13’मध्ये सिद्धार्थ आणि शहनाज यांचीकेमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती.त्यांच्यातील केमिस्ट्री पाहून त्यांच्या चाहत्यांनी त्यांना ‘सिडनाज’ हे नाव दिलं होतं. सिद्धार्थशहनाज गिल सोबत लग्न करणार असल्याची चर्चाही मध्यंतरी होती मात्र, हे सगळं खोट असल्याचं सिद्धार्थने तेव्हा सांगितलं होतं.


 

Web Title: shehnaaz gill is not fine after sidharth shukla death says her father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.