शंकर महादेवनला मिळाले रायझिंग स्टारच्या सेटवर सरप्राइज
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2017 12:30 IST2017-02-27T07:00:03+5:302017-02-27T12:30:03+5:30
शंकर महादेवन रायझिंग स्टार या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका बजावत आहे. शंकर महादेव ने आतापर्यंत इंडस्ट्रीला अनेक हिट गाणी दिली ...
शंकर महादेवनला मिळाले रायझिंग स्टारच्या सेटवर सरप्राइज
श कर महादेवन रायझिंग स्टार या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका बजावत आहे. शंकर महादेवने आतापर्यंत इंडस्ट्रीला अनेक हिट गाणी दिली आहे. शंकरचा नुकताच 50वा वाढदिवस झाला. त्याचा हा वाढदिवस रायझिंग स्टारच्या सेटवर खूप चांगल्याप्रकारे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या टीमने मिळून शंकरला खूप छान सरप्राइज दिले. या कार्यक्रमात दिलजित दोसंझ आणि मोनाली ठाकूर त्याच्यासोबत परीक्षकाची भूमिका सााकरत आहेत तर मयांक चँग आणि राघव जुयाल या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहेत. या सगळ्यांनी मिळून शंकरचा वाढदिवस खूप चांगल्याप्रकारे साजरा करण्याचा विचार केला. खरे तर शंकरचा वाढदिवस तीन मार्चला असतो. पण या दिवशी चित्रीकरण नसल्याने त्याच्या वाढदिवसाच्या काही दिवस आधी सगळ्यांनी वाढदिवस साजरा करायचे ठरवले. शंकरसाठी असलेले प्रेम व्यक्त करण्यासाठी मोनाली आणि दिलजितने शंकरची काही गाणी स्वतःच्या अंदाजात गाऊन दाखवली. शंकरला या सगळ्यांनी मिळून दिलेल्या या सरप्राइजमुळे तो खूपच खूश झाला होता. याविषयी या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक मयांक चँग सांगतो, "शंकर सरांनी त्यांच्या गीताच्या, संगीताच्या रूपाने आपल्याला खूप चांगले गिफ्ट दिले आहे. त्यापेक्षा आम्ही त्यांना काय चांगले गिफ्ट देऊ शकतो हे आम्हाला कळतच नव्हते. त्यामुळे त्यांच्या टायलेंटचे कौतुक करणे ही एकच गोष्ट आम्ही करू शकतो असे आम्हाला वाटले आणि त्यामुळे सगळ्या गायकांनी त्यांची गाजलेली गाणी सादर केली."
रायजिंग स्टारच्या टीमने खास शंकरसाठी त्याच्या फोटोचा केक बनवून घेतला होता. शंकर महादेवननेदेखील सगळ्यांना केक भरवून आपला वाढदिवस साजरा केला. तसेच सगळ्यांसोबत सेल्फीदेखील काढला.
रायजिंग स्टारच्या टीमने खास शंकरसाठी त्याच्या फोटोचा केक बनवून घेतला होता. शंकर महादेवननेदेखील सगळ्यांना केक भरवून आपला वाढदिवस साजरा केला. तसेच सगळ्यांसोबत सेल्फीदेखील काढला.