शंकर महादेवन यांनी सोहमला दिले हे वचन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2018 09:57 IST2018-01-31T04:27:00+5:302018-01-31T09:57:00+5:30

पुन्हा एकदा इतिहास रचत कलर्स रायझिंग स्टारची दुसरी आवृत्ती घेऊन आला आहे, भारताचा पहिला लाइव्ह गायनाचा रिअॅलिटी शो. यावर्षी भारताच्या ...

Shankar Mahadevan gave this word to Sohum | शंकर महादेवन यांनी सोहमला दिले हे वचन

शंकर महादेवन यांनी सोहमला दिले हे वचन

न्हा एकदा इतिहास रचत कलर्स रायझिंग स्टारची दुसरी आवृत्ती घेऊन आला आहे, भारताचा पहिला लाइव्ह गायनाचा रिअॅलिटी शो. यावर्षी भारताच्या पुढच्या संगीतमय सेन्सेशनच्या शोधातील प्रवासाला सुरूवात करण्यात आली आण त्यात भावना, इच्छा आणि पूर्वग्रहांद्वारे होणाऱ्या प्रक्रिया यांचे अडथळे तोडण्यात आले आहेत. दुसऱ्या आवृत्ती मध्ये रायझिंग स्टार अजून उंचावला आहे आणि सोच की दीवार उंचावण्याची आणि स्वतःतील शुध्दा टॅलेंट दाखवून चमकता तारा बनण्याची प्रत्येकाला संधी देणार आहे. 

शंकर महादेवन, मोनाली ठाकूर आणि दिलजित दोसांझ सारख्या संगीतातील निष्णात गुरूंपुढे परफॉर्म करणे हे एक आव्हानच आहे. पण, रायझिंग स्टार 2 वरील स्पर्धक सोहम (10) आणि चैतन्य (12) यांनी प्रत्येकाच्या अपेक्षेपलीकडे कामगिरी केली. त्यांच्या असाधारण टॅलेंटने या अतिशय गुणवान जोडीने प्रत्येकाचे लक्ष वेधून घेतले. सोहमच्या तबल्याने सर्वांना मंत्रमुग्ध केले तर चैतन्यने गायलेल्या दगाबाज रे या प्रसिध्द बॉलीवूड गाण्याने सर्वांची मने जिंकली. इतकेच नाही तर शंकर महादेवन यांनी सोहमचे तबला वाजविण्याचे कौशल्य उस्ताद झाकीर हुसेन यांना दाखविण्याचे वचन दिले. त्याच प्रमाणे, दिलजित दोसांझ यांनी त्यांच्या सोबत झिंगाट गाण्यावर डान्स करून त्यांच्या आकर्षक परफॉर्मन्सला पसंती दिली. सोहम आणि चैतन्य दोघांनाही अतिशय आनंद झाला हे सांगण्याची गरजच नाही आणि ते त्यांच्या पुढील परफॉर्मन्सने सर्वांची अशीच करमणूक करतील.  रायझिंग स्टार सीझन 2चे ध्येय आहे रिवाजांच्या विरुध्द जाऊन विचार करण्यासाठी आणि सोच की दीवार उचलण्यासाठी प्रत्येकाला प्रेरित करणे.

रायझिंग स्टार 2 ची रुजलेल्या वाटा मोडणारी संकल्पना स्पर्धकाच्या कौशल्य आणि टॅलेंटवर संपूर्णपणे भर देते. वयाची किंवा कोणत्याही बंधनाची अट नसलेला हा शो सोलो, ड्युएट आणि ग्रुप/बँड परफॉर्मन्स साठी खुला आहे. प्रेक्षकांचे लाइव्ह मनोरंजन करून मुग्ध करण्याची त्यांची क्षमता आणि त्यांचा आवाज त्यांना राष्ट्रीय प्रसिध्दी मिळवून देणार आहे., त्यांच्या पाठिंब्याच्या प्रत्येक मतामध्ये त्यांचे नशीब त्वरित बदलून टाकण्याची ताकद आहे. व्हियाकॉम 18 चा व्हिडिओ ऑन डिमांड मंचाला लाइव्ह व्होटिंग साठी सपोर्ट दिला आहे वूटने, आणि प्रेक्षकांची व्यस्तता शिखरावर पोहचविणाऱ्या, रायजिंग स्टार 2ने  भारतीय प्रेक्षकांना त्यांचा आवडता महत्वाकांक्षी गायक त्याची पार्श्वभूमी विचारात न घेता निवडण्याची ताकद दिली आहे.      

Web Title: Shankar Mahadevan gave this word to Sohum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.