शांभवी वाचवणार का सर्जाला निर्मलाच्या तावडीतून ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2017 16:25 IST2017-08-22T10:55:56+5:302017-08-22T16:25:56+5:30

आयुष्य संपल तरी प्रेम मरत नाही या कथासूत्रावर सुरु झालेली चाहुल ही मालिका आता खरोखरच त्या वळणावर येऊन पोहोचली ...

Shambhavi will save Sarjala from Nandla? | शांभवी वाचवणार का सर्जाला निर्मलाच्या तावडीतून ?

शांभवी वाचवणार का सर्जाला निर्मलाच्या तावडीतून ?

ुष्य संपल तरी प्रेम मरत नाही या कथासूत्रावर सुरु झालेली चाहुल ही मालिका आता खरोखरच त्या वळणावर येऊन पोहोचली आहे. शांभवी आणि सर्जा यांना असे वाटतच होते कि निर्मलाला मात देईन आता ते त्यांचा सुखाचा संसार थाटू शकतात. आता त्यांच्या प्रेमाला कोणाचीच नजर नाही लागणार, निर्मला आता त्यांच्या मार्गामध्ये कधीच येणार नाही पण आता हे सगळे शांभवी आणि सर्जावर उलटले आहे. निर्मलानाने सर्जाला कधीहि न सोडण्याचा शब्द पाळला आहे. निर्मलाने शांभवीचे रूप घेऊन तिच्या सर्जासोबत संसार सुरु केला आहे. यासाठी शांभवीच्या लुकमध्ये बदल देखील करण्यात आला आहे. पण, आता शांभवीच काय ? ती सर्जापर्यंत कधी पोहचू शकेल का?  शांभवीला हे निर्मला आणि सर्जा कुठे आहेत याची चाहूल कधी लागेल? 

लग्न झाल्यानंतर शांभवीचे रूप घेऊन सर्जासोबत आपला संसार सुरु करणारी निर्मला शांभवी कधीच सर्जापर्यंत पोहचणार नाही याची पूर्णपणे तयारी करून खऱ्या शांभवीला दुसऱ्या मुलीचा चेहरा देऊन सर्जासोबत दुसऱ्याच गावी निघून आली आहे. तिथे खरी शांभवी या द्विधा मनस्थितीत आहे कि आता मीच खरी शांभवी आहे हे सगळ्यांना कसे पटवून देऊ. कारण, निर्मलाने तिला कुणा दुसऱ्या मुलीचा चेहरा दिल्याने हा चेहरा कोणत्या मुलीचा आहे हे देखील शांभवीला माहिती नाही. या सगळ्या गोंधळा मध्ये शांभवीला सर्जा देखील वाचवायचे आहे. सर्जाला याची कल्पना देखील नाही कि आपल्यासोबत जी पत्नी म्हणून रहाते आहे ती शांभवी नसून निर्मलाच आहे. निर्मला मनातल्या मनात खूप खुश आहे कि, आता सर्जा माझा झाला आहे. आता त्यांच्या दोघांमध्ये कुणीच येणार नाही. यासगळ्यातून शांभवी सर्जाला कशी निर्मलाच्या तावडीतून वाचवतेय आणि आपणच खरी शांभवी आहे हे सगळ्यांना पटवून देते आहे हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे. 

Web Title: Shambhavi will save Sarjala from Nandla?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.