​शक्ती... अस्तित्व के एहसास की या मालिकेत पाहायला मिळणार करिना कपूरसारखा लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2017 17:27 IST2017-01-09T17:27:04+5:302017-01-09T17:27:04+5:30

करिना कपूरच्या स्टाइलचे अनेक दिवाने आहेत. तिच्यासारखे कपडे घालण्याचा, केसाची स्टाइल करण्याचा तिचे फॅन्स नेहमीच प्रयत्न करत असतात. पण ...

Shakti ... realizing the existence of this story in the series will be seen as Kareena Kapoor | ​शक्ती... अस्तित्व के एहसास की या मालिकेत पाहायला मिळणार करिना कपूरसारखा लूक

​शक्ती... अस्तित्व के एहसास की या मालिकेत पाहायला मिळणार करिना कपूरसारखा लूक

िना कपूरच्या स्टाइलचे अनेक दिवाने आहेत. तिच्यासारखे कपडे घालण्याचा, केसाची स्टाइल करण्याचा तिचे फॅन्स नेहमीच प्रयत्न करत असतात. पण टिव्ही मालिकांमधील अभिनेत्रीदेखील करिनासारखी स्टाइल करण्याचा प्रयत्न करत आहेत.
शक्ती... अस्तित्व की एहसास की ही मालिका एका तृतीयपंतीयाच्या आयुष्यावर आधारित आहे. छोट्या पडद्यावर एक वेगळा विषय या मालिकेद्वारे हाताळला जात असल्याने या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. या मालिकेत रुबिना दिलाइक तृतीयपंतीयची भूमिका साकारत आहे. 
रुबिना या मालिकेत सौम्या या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये सौम्या आपली बहीण सुरभी आणि हरमन यांचे लग्न लावण्याचा प्रयत्न करणार आहे. पण या सगळ्याला एक वेगळेच वळण मिळणार आहे. कारण हरमन सुरभी आणि सौम्या या दोघांसोबतही लग्न करणार आहे. हरमनच्या भूमिकेत सध्या विवियन डिसेन प्रेक्षकांचे मन जिंकत आहे. 
हरमनचे सौम्या आणि सुरभी दोघांसोबतही लग्न झाल्यानंतर मालिकेत खूप सारा ड्रामा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे आणि विशेष म्हणजे लग्नानंतर सुरभी प्रेक्षकांना एका वेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. 

kareena kapoor style
सुरभीचा हा लूक करिना कपूरसारखा असणार आहे. झलक दिखला जा या कार्यक्रमात करिना काही दिवसांपूर्वी आली होती. त्यावेळी तिने ज्याप्रकारचा पंजाबी ड्रेस घातला होता. तसेच पंजाबी ड्रेस सुरभी घालणार आहे. या मालिकेत सुरभीची भूमिका साकारणारी रोशनी सहोता सध्या चांगलीच खूश आहे. ती सांगते, "मला करिनाची स्टाइल खूप आवडते. काहीच दिवसांत मालिकेत माझा लूक बदलणार आहे. आता माझा लूक करिनासारखा असणार असल्याने मी खूपच आनंदित आहे." 


Web Title: Shakti ... realizing the existence of this story in the series will be seen as Kareena Kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.