पोरसच्या सेटवर रोहित पुरोहित पडला या बाळाच्या प्रेमात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 15:45 IST2018-04-03T10:15:10+5:302018-04-03T15:45:10+5:30
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनने पोरस या भव्य दिव्य मालिकेच्या माध्यमातून इतिहास जिवंत केला आहे आणि प्रत्येक भागानंतर मालिकेचे आकर्षण वाढते ...

पोरसच्या सेटवर रोहित पुरोहित पडला या बाळाच्या प्रेमात
स नी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनने पोरस या भव्य दिव्य मालिकेच्या माध्यमातून इतिहास जिवंत केला आहे आणि प्रत्येक भागानंतर मालिकेचे आकर्षण वाढते आहे. आगामी कथानकातून अॅलेक्झांडरची भूमिका साकारणारा रोहित पुरोहित आपले अभिनयाचे कौशल्य दाखवणार आहे. मालिकेच्या आगामी भागात अॅलेक्झांडर सिंहासनावरील आपले अधिराज्य सुरक्षित करण्यासाठी आपला भाऊ फिलिपच्या कुटुंबाचा नाश करतो असे दाखवण्यात येणार आहे. या दृश्याच्या चित्रीकरणामुळे रोहितला एक नवा आणि छानसा साथीदार मिळाला. या साथीदारासोबत चित्रीकरण करायला रोहितसोबत या मालिकेतील सगळेच खूश होते. या दृश्यात त्याला अॅलेक्झांडरच्या छोट्या बाळाला ठार करायचे होते. त्यामुळे मालिकेच्या सेटवर एक छोटासा पाहुणा आला होता. चित्रीकरणाच्यावेळी अॅलेक्झांडरची भूमिका साकारणारा रोहित त्या गोंडस मुलीच्या प्रेमातच पडला होता. या दृश्याआधी तो त्या मुलीसोबतच खेळत होता. त्याची त्या बाळासोबत चांगलीच गट्टी जमली होती. त्यामुळे या बाळासोबत चित्रीकरण करायला रोहितला खूपच मजा आली. अॅलेक्झांडरची भूमिका साकारताना रोहित खूप सारे दागिने घालतो. त्याच्या या दागिन्यासोबत देखील ही चिमुकली खेळत होती. या अनुभवाबद्दल बोलताना रोहित सांगतो, “अगदी लहान मुलांसोबत चित्रीकरण करणे हे तितकेसे सोपे नसते, विशेषतः जर तुम्ही अॅलेक्झांडरसारखी व्यक्तिरेखा साकारत असाल तर जराही नाही. एक नट म्हणून माझ्यासाठी हे एक कठीण दृश्य होते. पण एक माणूस म्हणून मला त्यातून नवीन काही तरी शिकायला मिळाले. लहान बाळाला मारणे हे खरे तर पटणारेच नाही. पण एक नट म्हणून तुम्हाला त्या दृश्याला न्याय द्यावाच लागतो. हे दृश्य करण्याअगोदर मला त्या बाळाशी मैत्रीचे नाते निर्माण करून त्या लहानग्या पोरीच्या मनात विश्वास निर्माण करावा लागला. ते बाळ खूपच गोंडस होते. तिच्यासोबत चित्रीकरण करताना मला खूप आनंद मिळाला आणि निरागसतेचा अनुभव मिळाला. एक नट म्हणून तुम्ही दररोज काही तरी नवीन शिकत असता आणि हा एक गोड धडा होता.”
Also Read : पोरस मालिकेतील सनी घनशानीला मेकअप करण्यासाठी लागतो दोन तासाहून अधिक वेळ
Also Read : पोरस मालिकेतील सनी घनशानीला मेकअप करण्यासाठी लागतो दोन तासाहून अधिक वेळ