​किंशूक वैद्य झळकणार आप के आजानेसे या मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2017 15:54 IST2017-11-20T10:24:04+5:302017-11-20T15:54:04+5:30

किंशूक वैद्यने बालकलाकार म्हणून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. शाकालाका बूम बूम या मालिकेत त्याने काम केले होते. ही मालिका ...

In this series you will be able to see Kinniskuk Vaidya | ​किंशूक वैद्य झळकणार आप के आजानेसे या मालिकेत

​किंशूक वैद्य झळकणार आप के आजानेसे या मालिकेत

ंशूक वैद्यने बालकलाकार म्हणून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. शाकालाका बूम बूम या मालिकेत त्याने काम केले होते. ही मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेत त्याने साकारलेल्या संजू या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. ही मालिका संपून अनेक वर्षं झाली असली तरी आजही ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे. किंशूकने या मालिकेसोबतच काजोल, अजय देवगण यांच्या राजू चाचा या चित्रपटात काम केले होते. एक रिश्ता साजेदारी या मालिकेद्वारे तो अनेक वर्षांनंतर छोट्या पडद्यावर परतला. तसेच त्याने ये है आशिकी या मालिकेत देखील काम केले होते. या मालिकेसोबतच तो धांगड धिंगा या मराठी चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसला होता. आता तो झी वाहिनीवरील एका मालिकेत झळकणार आहे. 
आप के आजानेसे ही मालिका प्रेक्षकांच्या लवकरच भेटीस येणार असून किंशूक या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेची कथा ही खूपच वेगळी असणार आहे. एक हटके प्रेमकथा या मालिकेद्वारे प्रेक्षकांसमोर आणण्याचा या मालिकेची टीम प्रयत्न करणार आहे. नायक आणि नायिकेत असलेल्या वयाच्या अंतरावर ही मालिका भाष्य करणार असून या मालिकेत नायक हा केवळ २५ वर्षांचा तर नायिका ही ३५ वर्षांची दाखवली जाणार आहे. नायक आणि नायिकेत १० वर्षांचे अंतर असल्याचे मालिकेत दाखवण्यात येणार आहे. या मालिकेचा नायक हा किंशूक असला तरी या मालिकेत नायिकेची भूमिका कोण साकारणार हे अद्याप ठरलेले नाही. बोधी ट्री मल्टीमीडिया या मालिकेची निर्मिती करत असून एका चांगल्या अभिनेत्रीची शोध सध्या सुरू आहे. या मालिकेत छोट्या पडद्यावरची एखादी प्रसिद्ध अभिनेत्री झळकणार असल्याची चर्चा आहे.
बोधी ट्री मल्टीमीडियाने आजवर निशा और उसके कझिन्स, ये है आशिकी, एक रिश्ता साझेदारी का यांसारख्या खूप चांगल्या मालिका छोट्या पडद्याला दिल्या आहेत. त्यामुळे त्यांची ही नवीन मालिका देखील हटके आणि चांगली असणार असल्याची प्रेक्षकांना खात्री आहे. 

Web Title: In this series you will be able to see Kinniskuk Vaidya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.