​पोरस या मालिकेत प्रणित भट्ट साकारणार ही भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2017 12:03 IST2017-07-31T06:33:12+5:302017-07-31T12:03:12+5:30

पोरस राजाच्या आयुष्यावर आधारित पोरस ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांच्या मनात या ...

In this series, the role of Pranit Bhatt will be played in Poros | ​पोरस या मालिकेत प्रणित भट्ट साकारणार ही भूमिका

​पोरस या मालिकेत प्रणित भट्ट साकारणार ही भूमिका

रस राजाच्या आयुष्यावर आधारित पोरस ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांच्या मनात या मालिकेविषयी चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे. या मालिकेत लक्ष लालवाणी, सुहानी धानकी यांसारखे कलाकार आपल्याला पाहायला मिळणार आहेत. लक्ष पोरसची प्रमुख भूमिका साकारणार आहे. 
या मालिकेत प्रणित भट्टदेखील एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रणितने महाभारत या मालिकेत साकारलेली शकुनीची भूमिका चांगलीच गाजली होती. आता या मालिकेत तो एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेत तो डरायस ही भूमिका साकारणार आहे. डरायस हा खलनायक असल्याचे आपल्याला पाहायला मिळणार आहे. ही भूमिका साकारण्यासाठी प्रणित खूपच उत्सुक आहे. तो सांगतो, मी आतापर्यंत साकारलेल्या सगळ्या भूमिकांपेक्षा ही खूप वेगळी आणि अतिशय दमदार भूमिका आहे. मी या मालिकेत एक खलनायकाची भूमिका साकारत आहे. डरायस हा परसिआ या राज्याचा राजा होता. ही माझी भूमिका प्रेक्षकांना आवडेल याची मला खात्री आहे.
या मालिकेचे बजेट हे जवळजवळ ५०० कोटींच्या घरात असून ही मालिका अतिशय भव्य असणार आहे. पोरस या मालिकेची कथा ख्रिस्तपूर्व 326च्या काळातील आहे. त्यामुळे प्राचीन काळातील वैभव उभे करण्यासाठी आणि तो काळ जिवंत करण्यासाठी अगदी छोट्यातील छोट्या गोष्टीकडे देखील बारकाईने लक्ष दिले जात आहे. या मालिकेत सुहानी लच्छी ही भूमिका साकारणार आहे.
पोरस या मालिकेचे काही चित्रीकरण थायलंडमध्ये झालेले आहे. थायलंडमधील चित्रीकरण संपल्यानंतर पुढील चित्रीकरण भारतात केले जाणार आहे. 

Also Read : ​सुहानी धानकी पोरस या मालिकेत

Web Title: In this series, the role of Pranit Bhatt will be played in Poros

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.