‘दिल ही तो है’ या मालिकेत करण कुंद्रा घालणार तब्बल इतके ब्लेझर्स!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2018 13:55 IST2018-05-26T08:25:21+5:302018-05-26T13:55:21+5:30
भारतीय टेलिव्हिजनवरील एक लोकप्रिय चेहरा करण कुंद्रा लवकरच छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील दिल ही तो ...
‘दिल ही तो है’ या मालिकेत करण कुंद्रा घालणार तब्बल इतके ब्लेझर्स!
भ रतीय टेलिव्हिजनवरील एक लोकप्रिय चेहरा करण कुंद्रा लवकरच छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील दिल ही तो है या मालिकेत तो ऋत्विक नून ही व्यक्तिरेखा साकारत आहे. ही मालिका लवकरच सुरू होणार असून या मालिकेची जोरदार तयारी सध्या सुरू आहे. या मालिकेची निर्मिती बालाजी टेलिफ्लिम्स करत आहे. करण कुंद्रा म्हणजेच ऋत्विक हा दिल्लीतील एक श्रीमंत, रुबाबदार बिझनेसमॅन असल्याचे मालिकेत दाखवले जाणार आहे. त्यामुळे या संपूर्ण मालिकेत तो जवळ जवळ १०० ब्लेझर घालणार आहे. वेगवेगळ्या ट्राउझर आणि जीन्सवर तो हे ब्लेझर घालणार आहे. ऋत्विकचे व्यक्तिमत्व आणि त्याची शैली लक्षात घेऊन कॉस्च्युम डिझाईनर्सच्या टीमने त्याचा हा लूक डिझाइन केला आहे. त्याच्या लूकवर टीमने खूप मेहनत घेतली असून त्याच्या व्यक्तिरेखेसाठी कोणते कपडे योग्य ठरतील हे पाहाण्यासाठी त्यांनी अनेक प्रयोग केले.
कॉस्च्युम डिझाईनर्सच्या टीमने ऋत्विकच्या ब्लेझर्समध्ये वैविध्यता आणण्यासाठी अनेक आठवडे मेहनत घेतली आहे. करण कुंद्रा प्रत्यक्ष जीवनात देखील स्टायलिश असल्याने ऋत्विक नूनची व्यक्तिरेखा सहज साकारण्यास त्याला मदत झाली आहे. ऋत्विक एक कुशल उद्योजक आहे. तो महागड्या गाड्या चालवतो आणि रुबाबात राहतो. आपल्या या नव्या व्यक्तिरेखेविषयी आणि लुकबद्दल बोलताना करण सांगतो, “मी एका रुबाबदार बिझनेसमनची भूमिका साकारत आहे. त्यामुळे माझा पोशाख स्टायलिश असायला हवा असे मालिकेच्या टीमचे म्हणणे होते. मी या मालिकेत १०० ब्लेझर घालणार आहे, ही कल्पना रोमांचित करणारी आहे. ऋत्विकचा लुक आणि त्याच्या पोषाखाची शैली नक्की करताना कॉस्च्युम डिझाइनर्सनी बारीक सारिक तपशील विचारात घेतले आहेत. टेलिव्हिजनवर क्वचितच पुरुष नटाच्या लुकबद्दल निर्माते इतके प्रयोग करताना दिसतात. पण माझी व्यक्तिरेखा उभी करण्यासाठी घेण्यात आलेल्या परिश्रमाचे मला कौतुक वाटते. त्यांच्या प्रयत्नांनी मी संतुष्ट आहे आणि हे प्रयत्न लवकरच पडद्यावर दिसतील तेव्हा प्रेक्षक देखील त्याचे कौतुक करतील अशी मला खात्री वाटते.”
Also Read : ‘दिल ही तो है’ मालिकेतून पूनम ढिल्लोन करणार पुनरागमन