'लागिरं झालं जी' मालिकेने गाठला 100 भागांचा पल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2017 17:58 IST2017-08-21T12:03:51+5:302017-08-21T17:58:55+5:30

'लागिरं झालं जी' या मालिकेने छोट्या पडद्यावर एंट्री करताच अल्पावधीतचरसिकांची पसंती मिळवली.पहिल्या एपिसोडपासून सुरू झालेला या मालिकेचा छोट्या पडद्यावरचा ...

A series of 100 steps reached by 'Lgiran Jhal gi' series | 'लागिरं झालं जी' मालिकेने गाठला 100 भागांचा पल्ला

'लागिरं झालं जी' मालिकेने गाठला 100 भागांचा पल्ला

'
;लागिरं झालं जी' या मालिकेने छोट्या पडद्यावर एंट्री करताच अल्पावधीतचरसिकांची पसंती मिळवली.पहिल्या एपिसोडपासून सुरू झालेला या मालिकेचा छोट्या पडद्यावरचा प्रवास आता बघता बघता 100 एपिसोडपर्यंत येऊन पोहचला आहे.नुकतेच या मालिकेने 100 भाग पूर्ण करत मालिकेच्या सेटवर जल्लोषात केक कटींग करत सेलिब्रेशन केले. 'लागिर झालं जी' मालिका शीतल आणि अजिंक्यच्या जोडीवर आधारित आहे.नितिश चव्हाणने अजिंक्य ही भूमिका साकारली आहे तर शिवानी बावकरने शीतली ही भूमिका साकारली आहे.विशेष म्हणजे विविध मालिकांमधील नायक-नायिकांच्या जोड्या रसिकांचे लक्ष वेधून घेतात.त्यात मग राणा- अंजली( तुझ्यात जीव रंगला) असो किंवा गुरुनाथ-राधिका(माझ्या नव-याची बायको) किंवा मग शिव-गौरी( काहे दिया परदेस) असो या मालिकेतील प्रत्येक जोडी घराघरात पोहचली.या प्रत्येक जोडीला रसिकांनी अक्षरक्ष: डोक्यावर घेतलं.आता या लोकप्रिय जोड्यांच्या यादीत शीतल आणि अजिंक्यची जोडीसुद्धा सुपरहिट ठरत आहे.मालिकेतील अजिंक्यला सैन्यात भरती व्हायचे आहे. ते त्याचे पहिले प्रेम आहे.याच फौजीच्या प्रेमात शीतल कशी पडते हे या मालिकेतून रसिकांना पाहायला मिळत आहे. सातारा जिल्हा आणि भारतीय सैन्याचं असलेलं नातं, तेथील तरुणांची स्वप्नं आणि ती पूर्ण करण्यासाठीची त्यांची धडपड अशी कथा 'लागिरं झालं जी' या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.अजिंक्यचे केवळ एकच स्वप्न आहे आणि ते म्हणजे सैन्यात भरती होऊन देशाची सेवा करायची तर दुसरीकडे अजिंक्यच्या पूर्णपणे विरुद्ध स्वभावाची शीतल आहे.सतत हसत खेळत जगणारी शितल घरातील सगळ्यांची लाडकी असते.या मालिकेतील भूमिकेतून शिवानी आणि नितीश आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत.त्यामुळे 100 एपिसोड पूर्ण केलेल्या मालिकेचे आगामी काळात 1000 एपिसोड होवोत याच शुभेच्छा.

Web Title: A series of 100 steps reached by 'Lgiran Jhal gi' series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.