200 मुलांच्या ऑडिशनमधून निर्णय समधियाची निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2017 14:41 IST2017-05-27T09:11:11+5:302017-05-27T14:41:11+5:30

'परमावतारा श्री कृष्ण' नव्या मालिकेसाठी छोट्या कृष्णाचा भूमिकेसाठी बालकलाकाराचा शोध गेल्या अनेक दिवसापांसून सुरु होता. 200 मुलांच्या ऑडिशनमधून निर्णय ...

Selection of judges in 200 boys audition | 200 मुलांच्या ऑडिशनमधून निर्णय समधियाची निवड

200 मुलांच्या ऑडिशनमधून निर्णय समधियाची निवड

'
;परमावतारा श्री कृष्ण' नव्या मालिकेसाठी छोट्या कृष्णाचा भूमिकेसाठी बालकलाकाराचा शोध गेल्या अनेक दिवसापांसून सुरु होता. 200 मुलांच्या ऑडिशनमधून निर्णय समधियाची निवड करण्यात आली. भारतातील सर्वात लोकप्रिय आणि पूजनीय देवाची कथा या मालिकेतून सांगितली जाणार आहे.  इंदौरमधील या चार वर्षांच्या कलाकाराने आपल्या क्युट लुक्स आणि निरागसपणे साकारलेल्या नटखट कन्हैयामुळे निर्मात्यांना जणू संमोहितच केले आहे. या वयातील त्याच्यातील अप्रतिम अभिनय क्षमता आणि उत्साही स्वभाव यामुळे या भूमिकेसाठी तो योग्य ठरला. 

या बद्दलच निर्णयची आई. डॉ. दीपाली समधिया म्हणाल्या, इंदौरमधील शाळेत विविध स्पर्धांमध्ये निर्णय हनुमान, राम आणि कृष्ण बनला आहे. पण, मला वाटते की तो कृष्णासारखाच आहे. काहीसा मस्तीखोर, निरागस आणि सगळ्यांना हसवणारा. त्याला कृष्णासारखे तयार व्हायला आवडते आणि त्याला त्याचा आवडता कृष्ण स्क्रीनवर साकारण्याची संधी मिळाली याचा मला आनंद आहे.  

या मालिकेचे निर्माते अलिंद श्रीवास्तव म्हणाले, बाळकृष्णाच्या भूमिकेसाठी आम्ही देशभरात सुमारे 200 हुन अधिक मुलांची ऑडिशन घेतली. निर्णय ऑडिशनला आला तेव्हा आत आल्यावर पहिले वाक्य म्हणाला- मला कृष्ण बनायचे आहे. इतकेच नाही, त्याने आम्हाला कृष्णाची गोष्ट ही सांगितली. आम्हाला त्याच वेळी कळले की आम्हाला आमचा कृष्ण सापडला आहे. तो फारच क्युट आणि छान मुलगा आहे आणि त्याच्यामध्ये नैसर्गिक अभिनय आहे. खोडसळपणा, देवत्त्व आणि खट्याळ हसू असे सगळे त्याच्याकडे आहे. 
आपले क्युट लुक्स आणि प्रेमळ स्वभावामुळे निर्णयचे आताच अनेक चाहते आहेत. त्यांनी नुकतेच मालिकेच्या चित्रिकरणाला सुरुवात केली. आतापासूनच सगळी कास्ट आणि क्रू त्याचे लाड करत असतात आमि मोकळ्या वेळेत त्याच्या आसपासच असतात.  

Web Title: Selection of judges in 200 boys audition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.