SEE Pics: स्पेनमध्ये बॉयफ्रेंडसह रोमान्स करतेय हीना खान
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2017 12:16 IST2017-07-07T06:39:15+5:302017-07-07T12:16:39+5:30
हिना 'खतरो के खिलाडी'च्या फिनालेमध्ये पोहोचली आहे. तिच्याशिवाय रवी दुबे आणि शांतनू महेश्वरीही टॉप 3 मध्ये आहेत.
.jpg)
SEE Pics: स्पेनमध्ये बॉयफ्रेंडसह रोमान्स करतेय हीना खान
' ;ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेमुळे घराघरात पहोचलेली अक्षरा म्हणजे हिना खानने ही मालिका सोडल्यानंतर खतरों के खिलाडी या शोमध्ये सहभागी झाली आहे. या शोमुळे पहिल्यांदा हिना खानचा ग्लॅमरस अंदाज रसिकांना पाहयला मिळतोय. एरव्ही साडी दागिन्यांमध्ये नटलेली हीना खानची प्रत्येक स्टाइल तिच्या चाहत्यांनी आपलीशी केली.मात्र आता हिनाचा म्हणजेच अक्षराचा लूक चेंज झाल्यामुळे तिच्या चाहत्यांना आपण कोण्या दुस-या अभिनेत्रीला पाहात असल्याचा प्रतिक्रीया तिच्या फोटोला पाहायला मिळतायेत. हिना खान सध्या स्पेनमध्ये रियालिटी शो 'खतरों के खिलाडी'8चे शुटिंग करत आहे. विशेष म्हणजे हिनासह तिचा बॉयफ्रेंड रॉकीदेखिल स्पेनमध्ये गेला आहे. शूटिंगमधून वेळ मिळेल तसे हे दोघे एकमेकांची कंपनी एन्जॉय करत असल्याचे त्यांच्या फोटवरून कळते. खुद्द हिना खान तिचे काही कॅनडीड फोटो तिच्या इन्स्टाग्रामा पेजवर शेअर केले आहेत.या फोटोंमध्ये ती बॉयफ्रेंडबरोबर रोमान्स करत असल्याचे पाहायला मिळत आहे. फोटोंमध्ये हिनाचा ग्लॅमरस लूक पाहून चाहतेही तिला वेगवेगळ्या प्रतिक्रीया देत असतात.हिना खतरो के खिलाडीच्या फिनालेमध्ये पोहोचली आहे. तिच्याशिवाय रवी दुबे आणि शांतनू महेश्वरीही टॉप 3 मध्ये आहेत.काही तरी हटके आणि रॉकींग कऱण्याच्या विचार हिना आधीपासूनच करत होते. त्यामुळे तिने ये रिश्ता क्या कहलाता है मालिका सोडत चॅलेंजिग काम स्विकारले. या रिअॅलिटी शोनंतर हिना बिग बॉस 11व्या सिझनमध्येही एंट्री करणार असल्याची माहिती मिळतेय.तसेच लवकरच हिना बॉयफ्रेंड रॉकीसह विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चाही रंगल्या आहेत.