SEE PICS: कृतिका कामरा साकारत असलेल्या 'चंद्रकातांच्या' भूमिकेची पहिली झलक आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2017 22:15 IST2017-01-25T11:13:49+5:302017-01-25T22:15:32+5:30

'चंद्रकांता'ही अशी पहिली मालिका आहे जी एकाच नावाने दोन वेगेवगेळ्या चॅनलवर प्रसारित केले जाणार आहे. एका चॅनलवर चंद्रकाताची भूमिका ...

SEE PICS: The first glimpse of the role of 'Chandrakata' in the form of Kritika Kamra came in front | SEE PICS: कृतिका कामरा साकारत असलेल्या 'चंद्रकातांच्या' भूमिकेची पहिली झलक आली समोर

SEE PICS: कृतिका कामरा साकारत असलेल्या 'चंद्रकातांच्या' भूमिकेची पहिली झलक आली समोर

'
;चंद्रकांता'ही अशी पहिली मालिका आहे जी एकाच नावाने दोन वेगेवगेळ्या चॅनलवर प्रसारित केले जाणार आहे. एका चॅनलवर चंद्रकाताची भूमिका संजीदा शेख साकारणार आहे तर दुस-या  चॅनलवर चंद्रकांताच्या भूमिकेत कृतिका कामरा झळकणार आहे. यात आता स्टार प्लस चॅनवरली 'चंद्रकाताःप्रेम या पहेली' या मालिकेेच्या शूटिंगला सुरूवात करण्यात आली असून कृतिका कामराच्या लूकवरही मालिकेच्या कथेप्रमाणे खूप मेहनत घेण्यात आल्याचे दिसतंय. नुकतेच कृतिकाने तिच्या या मालिकेतील गेटअपमधला एक फोटो सोशलमीडियावर शेअर केला आहे.या फोटोमध्ये कृतिका पूर्ण ट्रेडीशनल लूकमध्ये दिसत असून कृतिकाच्या व्हाइट गोल्डन रंगाच्या बॅकलेस कॉस्च्युम असलेल्या फोटोमध्ये तिचा घायाळ करणारा अंदाज  पाहायला मिळतोय. या मालिकेसाठी निरूशा निखतने कृतिकाचा हा कॉस्च्युम डिझाईन केला आहे. 



तर दुसरी चंद्रकांता ही मालिका लाईफ ओके चॅनलवर सुरू होणार आहे.यासाठी वेगेवगेळ्या अभिनेत्रींचे चंद्रकांताच्या भूमिकेसाठी वर्णी लागल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानुसार संजीदा शेखची या भूमिकेसाठी निवड करण्यात आली आहे.देवकीनंदन खत्री यांच्या चंद्रकांता या 'कल्पनारम्य' कादंबरीवर ही मालिका आधारित आहे.1990 साली  दूरदर्शनवर  चंद्रकांताही मालिका हिट ठरली होती.या मालिकेत शीखा स्वरूपने चंद्रकांताच्या भूमिकेने सा-यांची मनं जिंकली होती.आता पुन्हा एकदा चंद्रकांताची तिच क्रेझ निर्माण करण्यासाठी हिना खान सज्ज झाली आहे. त्यानुसार आता पुन्हा एकदा चंद्रकांता सुरू होणार असली तरीही नवीन ढंगात ही मालिका रसिकांना पाहायला मिळेल.‘देवों के देव- महादेव’ या आपल्या भव्य मालिकेनंतर निखिल सिन्हा यांनी ‘चंद्रकांता’ या मालिकेची निर्मिती केली आहे. येत्या मार्च महिन्यात चंद्रकांताचे प्रसारण करण्यात येईल असे मालिकेच्या टीमने सांगितले आहे. एकेकाळी दुरदर्शनवर हिट ठरलेली मालिका आता दोन दोन चॅनल्सवर प्रसारित होणार असल्यामुळे या मालिकेला रसिकांची कशी पसंती मिळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
 

 

Web Title: SEE PICS: The first glimpse of the role of 'Chandrakata' in the form of Kritika Kamra came in front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.