'गोठ' मालिकेत दडलंय गुपित?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2017 16:32 IST2017-08-11T11:02:51+5:302017-08-11T16:32:51+5:30

श्रावण महिना नवविवाहितांसाठी खूप आनंदाचा असतो. या महिन्यात मंगळगौर, हळदी-कुंकवासारखे कार्यक्रम होतात. त्या निमित्तानं त्यांना नटायला मिळतं.पतीसाठीचे हे व्रत ...

'Secret' secret in the 'Goth' series? | 'गोठ' मालिकेत दडलंय गुपित?

'गोठ' मालिकेत दडलंय गुपित?

रावण महिना नवविवाहितांसाठी खूप आनंदाचा असतो. या महिन्यात मंगळगौर, हळदी-कुंकवासारखे कार्यक्रम होतात. त्या निमित्तानं त्यांना नटायला मिळतं.पतीसाठीचे हे व्रत प्रत्येक स्त्री मनापासून करत असते.छोट्या पडद्यावरही मंगळागौरचं सेलिब्रेशन जोरदार सुरू आहे.‘गोठ’ या लोकप्रिय मालिकेत प्रेक्षकांना राधाची पहिली मंगळागौर पहायला मिळणार आहे. मात्र, या मंगळागौरीतच राधाच्या हाती रहस्यमय 'गोठ' लागणार आहे.म्हापसेकरांच्या घरात बयोआजीचा वचक आहे. तिच्या मर्जीनंच घरातला कारभार चालतो. आता श्रावणातली सगळी व्रतवैकल्य करण्यासाठी राधानं पुढाकार घेतला आहे. तिच्या जावांचाही तिला पाठिंबा आहे. राधाची पहिली मंगळागौर असल्यानं म्हापसेकरांच्या घरात उत्साहाचं वातावरण आहे. मात्र, बयोआजीचा धाकही आहे. या धाकातून मुक्त करणं, घराला स्वातंत्र्य मिळवून देणं हे राधाचं उद्दिष्ट आहे. राधाच्या पहिल्या मंगळागौरीची जय्यत तयारी झाली आहे. घरातलं अनिष्ट दूर होऊन घर सुखानं नांदावं अशी प्रार्थना राधा मंगळागौरीच्या पूजेवेळी करते. त्याच दिवशी मंगळागौरीचे खेळ खेळताना राधाला कांचनचा गोठ सापडतो. या गोठमध्ये काहीतरी गुपित दडलं आहे. हे गुपित काय आहे, याचा उलगडा लवकरच होणार आहे.मंगळागौरीच्या दिवशी नेमकं काय घडतं? राधाला कांचनचा गोठ कसा मिळतो? त्यात काय असतं हे जाणून घेण्याठी रसिकांमध्येही कमालीची उत्सुकता पाहायला मिळतेय.गोठ ही मालिका आता महत्त्वाच्या टप्प्यावर आली आहे. 'स्त्रियांचे निर्णय स्त्रियांच्या हाती' असा विचार ही मालिका मांडत आहे. मालिका सुरू झाल्यापासूनच प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभतो आहे. सातत्यानं कथानकात येणारी वळणं मालिकेविषयी उत्सुकता निर्माण करत आहेत. मात्र, आता मालिकेला वेगळंच वळण मिळणार असल्याचं चित्र आहे. 

Web Title: 'Secret' secret in the 'Goth' series?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.