सरताज गिल ख-या आयुष्यातही आहे 'सन ऑफ सरदार'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2016 16:49 IST2016-12-26T14:33:06+5:302016-12-26T16:49:03+5:30
मालिकेच्या कथेनुसार, ट्रॅकनुसार कलाकरांना गेटअप बदलावे लागतात.कधी ते त्यांना आवडतातही कधी आवडतही नाही. मात्र जेव्हा आपण जसे आहोत त्याचप्रमाणे ...
सरताज गिल ख-या आयुष्यातही आहे 'सन ऑफ सरदार'
म लिकेच्या कथेनुसार, ट्रॅकनुसार कलाकरांना गेटअप बदलावे लागतात.कधी ते त्यांना आवडतातही कधी आवडतही नाही. मात्र जेव्हा आपण जसे आहोत त्याचप्रमाणे आपल्याला आपली वेशभूषा करायला मिळाली तर ते काम कऱण्यात काही औरच मजा असते असेच काहीसे झाले आहे.‘एक था राजा, एक थी रानी’ या मालिकेतील सरताज गिलसोबत. सरताज गिल साकारत असलेल्या राजाच्या व्यक्तिरेखेला गेल्या काही दिवसांत फार अवघड परिस्थितीतून जावे लागले आहे. आधी अपघात, मग तुरुंगवास, त्यानंतर इक्बालकडून (इक्बाल खान) प्राणघातक हल्ला आणि शेवटी कडेलोट अशा विविध अवघड प्रसंगांना त्याला सामोरे जावे लागले असून त्यातून तो कसाबसा वाचला आहे. कड्य़ावरून कोसळल्यामुळे राजा मरण पावला, अशीच बहुतेकांची समजूत झालेली असली,तरी आता तो परतला आहे- पण एका तरूण शीख व्यक्तीच्या वेषात. सरताज गिल वास्तव जीवनातही एक पंजाबीच असल्याने त्याला हा आपले हे नवे रूप फार आवडले आहे. आपल्या या नव्या रूपाबद्दल सरताज सांगतो, “माझ्या आजवरच्या कारकीर्दीत मी ज्या भूमिका रंगविल्या, त्यापेक्षा ही पूर्णपणे भिन्न व्यक्तिरेखा आहे. मी स्वत: पंजाबी असलो, तरी मला या रूपात आजपर्यंत कोणीही पाहिलेलं नाही.मालिकेत मला किती काळ या रूपात वावरावं लागणार आहे, ते मला ठाऊक नाही. पण सध्या तरी मला यात मजा वाटते आहे. मला एक वेगळीच व्यक्ती बनल्यासारखं वाटत असून सेटवर सुरुवातीला मला या रूपात कोणी ओळखलंच नाही .मला ही पगडी खूप आवडत असली,
तरी ती बांधायला फार कष्ट करावे लागतात. चष्मा आणि दाढी-मिशा यांच्यातून योग्य भावप्रदर्शन करणं हे एक आव्हानच आहे.” तो पुढे म्हणाला, “यापूर्वी मी अर्ध्या तासात रंगभूषा करून तयार होत असे. आता मला दोन तासांहून अधिक वेळ लागतो.”‘एक था राजा, एक थी रानी’च्या कथानकाचा काळ अलीकडेच चार महिन्यांनी पुढे नेण्यात आला आहे. आता आगामी भागांमध्ये राजा आणि राणीच्या आयुष्याला आणखी एक कलाटणी मिळाल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळेल. इक्बालच्या कारस्थानामुळे या दोघांच्या आयुष्यात काही दुर्दैवी घडामोडी होतात.राजाच्या मृत्यूमुळे हादरलेली राणी भीती आणि संतापाच्या भरात त्याच्या मृत्यूचा सूड उगविण्याचा निश्चय करते. या योजनेचा पहिला भाग म्हणजे इक्बालला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढणे हा असतो. कड्य़ावरून कोसळल्यामुळे राजाचा मृत्यू झाल्याचा अमरकोटमध्ये सर्वांचा समज झाला, तरी एका दूरच्या खेड्य़ात बिंदू राजाला वाचविते. आता इक्बालवर सूड उगविण्यात राणीला यश येते का? की राजा परतल्यावर तिला इक्बालच्या जवळ गेल्याचे पाहून तिची योजना तिच्यावरच उलटेल?याचा उलगडा होताना येणा-या भागात पाहायला मिळणार आहे.